नवी दिल्ली- सोशल मीडियावर एका कंपनीचा मेमो व्हायरल होत आहे. हा मेमो वाचून सोशल मीडियावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. मेमोमध्ये म्हणण्यात आलंय की, 'मुल आजारी आहे म्हणून त्याची काळजी घेण्यासाठी सुट्टी घेणे हे काही कारण असू शकत नाही. आम्ही तुमच्या मुलाला कामावर ठेवलेलं नाही'
कंपनीचा हा मेमो वाचून नेटकऱ्यांनी कंपनीवर आगपाखड केली आहे. कंपनीच्या या पॉलिसीवर नेटकऱ्यांनी तोंडसुख घेतलं आहे. याशिवाय अशा कंपनीवर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. कंपनीचा हा मेमो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.