मोठी बातमी! जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी जोरदार चकमक; लष्कराचे 3 जवान शहीद, शोध मोहीम सुरूच

चकमकीच्या ठिकाणी पाठवण्यात आल्या आणखी फौजा, शोध मोहीम केली तीव्र
Jammu and Kashmir Kulgam
Jammu and Kashmir Kulgamesakal
Updated on
Summary

काश्मीरमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तौयबा (एलईटी) ची शाखा 'द रेझिस्टन्स फ्रंट' (TRF) या दहशतवाद्यांच्या तीन साथीदारांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात (Jammu and Kashmir Kulgam) शुक्रवारी दहशतवाद्यांशी (Terrorist Attack) झालेल्या चकमकीत लष्कराचे 3 जवान (Indian Army) शहीद झाले.

एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील हलान जंगल परिसरात अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यानंतर शोध मोहिमेचं चकमकीत रूपांतर झालं. जवानांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं.

Jammu and Kashmir Kulgam
Lok sabha Election 2024: ठरलं! महादेव जानकर CM योगींच्या राज्यातून लढवणार लोकसभा निवडणूक? 'या' मतदारसंघातूनही आजमावणार नशीब

या गोळीबारात सुरक्षा दलाचे तीन जवान जखमी झाले असून उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं अधिकाऱ्यानं सांगितलं. श्रीनगरस्थित लष्कराच्या चिनार कॉर्प्सनं एका ट्विटमध्ये म्हटलंय, 'कुलगाममधील हलानच्या उंच भागात दहशतवादी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी 4 ऑगस्ट रोजी कारवाई सुरू केली. दहशतवाद्यांसोबत झालेल्या गोळीबारात तीन जवान जखमी झाले आणि उपचारादरम्यान ते शहीद झाले.

लष्कर अधिकाऱ्यानं सांगितलं की, चकमकीच्या ठिकाणी आणखी फौजा पाठवण्यात आल्या असून शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे. यापूर्वी, काश्मीरमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तौयबा (एलईटी) ची शाखा 'द रेझिस्टन्स फ्रंट' (TRF) या दहशतवाद्यांच्या तीन साथीदारांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती.

Jammu and Kashmir Kulgam
Loksabha Election : 'कल्याण' जिंकण्यासाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; खासदार शिंदेंचं वाढणार टेन्शन, 'हा' बडा नेता होणार सक्रीय!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामुल्ला येथील इम्रान अहमद नजर, श्रीनगर येथील वसीम अहमद मट्टा आणि बिजबेहारा येथील वकील अहमद भट अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून तीन हातबॉम्ब, 10 राउंड पिस्तूल, 25 एके-47 रायफल आणि इतर आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()