Narendra Modi : यूपीत लांगूलचालनाचे राजकारण संपले ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

१४० कोटी भारतीय परिवार असल्याचा दावा
P.M Narendra Modi
P.M Narendra Modiesakal
Updated on

आझमगड : ‘‘विकासाची नवनवी शिखरे गाठणाऱ्या उत्तर प्रदेशात आता लांगूलचालनाच्या राजकाराणाचे विष कमकुवत झाले आहे,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. उत्तर प्रदेशातील आझमगड येथे विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

P.M Narendra Modi
Waxing Tips : वॅक्सिंग केल्यानंतर या 5 गोष्टी करू नका, त्वचा पडू शकते काळी..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी आझमगड, श्रावस्ती, चित्रकूट आणि अलिगड येथील विमानतळांचे उद्‍घाटन आणि लखनौ येथील चौधरी चरणसिंह आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनल्सचे उद्‍घाटन झाले. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणातील घराणेशाहीवर जोरदार टीका केली. ‘‘या मतदारसंघात वर्चस्व असणाऱ्या घराण्याचा मागील निवडणुकीमध्ये दिनेशलाल यादव यांसारख्या युवकांनी पराभव केला.

P.M Narendra Modi
Tanning Removal Tips : पायांवरील टॅनिंग जात नाहीये? मग,'या' सोप्या उपायांच्या मदतीने पायांचे सौंदर्य परत मिळवा

त्यामुळेच आता या घराणेशाहीवादी राजकीय नेत्यांना नैराश्‍य आले असून ते माझ्यावर आरोप लावतात की, मला कुटुंब नाही. परंतु ते विसरतात की देशातील १४० कोटी जनता हे माझे कुटुंबच आहे,’’ असे मोदी म्हणाले. एकीकडे उत्तर प्रदेश विकासाची नवनवी शिखरे गाठत असताना दुसरीकडे राज्यातील लांगूलचालनाच्या राजकाराणाचे विष कमकुवत होत आहे, असे प्रतिपादन करत त्यांनी विरोधकांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

P.M Narendra Modi
Hair Care Tips : हेअर स्टायलिंग आणि कलरिंगमुळे केसांची चमक गेलीय? मग, 'या' नैसर्गिक हेअर मास्कचा करा वापर

मोदी म्हणाले

-एकेकाळी मागास गणला जाणारा आझमगड मतदारसंघ आज विकासाचा नवा अध्याय लिहीत आहे

-विकासकामांचा संबंध निवडणुकांशी जोडून नका, २०४७मध्ये विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी विकासकामांना वेग

-सध्याच्या विरोधी पक्षांचे सरकार असताना ते केवळ विकासकामांची घोषणा करत असत मात्र ती कामे सुरू करत नसत

उद्‍घाटन आणि भूमिपूजन

पंतप्रधान मोदी यांनी महाराजा सुहेलदेव विद्यापीठाच्या इमारतीचे उद्‍घाटन केले. त्याचप्रमाणे त्यांनी सुमारे ११ हजार ५०० कोटी रुपयांच्या उत्तर प्रदेशातील पाच मोठ्या राष्ट्रीय महामार्गांचे उद्‍घाटन आणि भूमिपूजन केले. त्याचप्रमाणे पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या उत्तर प्रदेशातील सुमारे पाच हजार ३४२ किमी रस्त्यांचे उद्‍घाटन केले. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशातील विविध ठिकाणच्या १२ रेल्वे प्रकल्पांचे उद्‍घाटन आणि भूमिपूजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.