English Speaking Farmer: अठरा वर्षे पुण्यात राहिलेल्या शेतकऱ्यानं इंग्रजीत विचारला प्रश्न; CM भडकले!

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
bihar will be played like Maharashtra Bihar MLA  MP  are losing faith in Nitish Kumar says bjp mp
bihar will be played like Maharashtra Bihar MLA MP are losing faith in Nitish Kumar says bjp mp esakal
Updated on

पाटणा : अठरा वर्षे पुण्यात राहिलेल्या एका शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारल्यानं ते भलतेच भडकल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यावरील प्रतिक्रियेवरुन मुख्यमंत्र्याना टीकेचा सामना करावा लागत आहे. (English speaking Farmer who lived in Pune CM Nitish Kumar slams him)

बिहारमधील ही घटना असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या एका जाहीर कार्यक्रमात एका तरुणानं त्यांना थेट इंग्रजीत प्रश्न विचारला. यावर नितीश कुमार भलतेच भडकले आणि त्यांनी जाहीर सभेत सर्व शेतकऱ्यांना झापलं. त्यांच्या या कृतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

bihar will be played like Maharashtra Bihar MLA  MP  are losing faith in Nitish Kumar says bjp mp
Sansad Ratna Awards 2023: संसदरत्न पुरस्कारांसाठी १३ खासदारांना नामांकन; महाराष्ट्रातून 'यांचा' समावेश

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना चांगलंच झोडलं आहे. मुख्यमंत्र्यांनी उच्चशिक्षित शेतकऱ्याचा उत्साह वाढवण्याऐवजी इंग्रजीतील शब्द वापरण रुचलेलं नसल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

कोण आहे इंग्रजीत बोलणारा शेतकरी?

अमित कुमार गेल्या १८ वर्षांपासून पुण्यात राहत होते. पुण्यात MBA केल्यानंतर ११ वर्षे कॉर्पोरेट क्षेत्रात जॉब केल्यानंतर ते कोरोना काळात बिहारमधील आपल्या गावी परतले. तसेच गावात त्यांनी शेती सुरु केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.