"धार्मिक शाळांमध्ये तेव्हाच प्रवेश असावा जेव्हा मुलं स्वतः निर्णय घेऊ शकतील"

मुख्यमंत्र्यांचं विधानामुळं नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता
Madarsa_vedpathshala
Madarsa_vedpathshala
Updated on

नवी दिल्ली : कोणत्याही धार्मिक शैक्षणिक संस्थांमध्ये तेव्हाच प्रवेश असावा जेव्हा मुलं स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतील, असं विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी केलं आहे. दिल्लीत ते माध्यमांशी बोलत होते. त्यांच्या या विधानामुळं नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे. (Entry to any religious institution should be at an age where they can make their own decisions CM Himanta Biswa Sarma)

मुख्यमंत्री सर्मा म्हणाले, "मदरशांमध्ये शिक्षणाची अशी व्यवस्था असायला हवी ज्यामुळं भविष्यात इथल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही क्षेत्रात काम करण्याचा पर्याय उपलब्ध असावा. त्यामुळं कोणत्याही धार्मिक शैक्षणिक संस्थांमध्ये आशाच वयात प्रवेश देण्यात यावा जेव्हा मुलं स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतील"

Madarsa_vedpathshala
'उंटाच्या तोंडात जिरे'; व्हॅट कमी केल्यानंतर फडणवीसांची टीका

केंद्रानं इंधनाचे दर कमी केल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना सर्मा म्हणाले, भाजपशासित राज्यांशिवाय इतर राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट अद्याप कमी केलेला नाही. त्यामुळं भाजपशासित राज्ये आणि इतर राज्यांमध्ये इंधनाच्या दरांमध्ये मोठी तफावत आहे. विरोधीपक्षांची सरकारं असलेल्या राज्यांची ही पहिली जबाबदारी आहे की त्यांनी व्हॅट कमी करावा आणि जनतेला दिलासा द्यावा.

दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारनं नुकतेच मदरशांबाबत दोन महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यांमध्ये योगी सरकारनं यूपीतल्या मदरशांना देण्यात येणारं अनुदान बंद केलं आहे तसेच या राज्यातील मदरशांमध्ये धार्मिक प्रार्थनेपूर्वी राष्ट्रगीत म्हणणं बंधनकारक करण्यात आलं आहे. या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची तसेच याकडे लक्ष देण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()