EPFOचा दिलासा! हायर पेन्शनच्या अर्जासाठी पुन्हा मुदतवाढ; जाणून घ्या काय आहे नवी तारीख

यापूर्वीची अंतिम तारीख २६ जून २०२३ होती. तसेच अनेक अर्जदारांना सोमवारी पोर्टलवर अडचणी येत होत्या.
EPFO Marathi News
EPFO Marathi NewsEPFO Marathi News
Updated on

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संगठन अर्थात EPFOनं आपल्या हायर पेन्शनसाठी (उच्च निवृत्तीवेतन) अर्ज करण्याला मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी २६ जून २०२३ ही अंतिम तारीख होती. पण याच शेवटच्या दिवशी सोमवारी अनेक अर्जदारांना पोर्टलवर अर्ज भरण्यात अडचणी येत होत्या. तांत्रिक बिघाडामुळं हा प्रॉब्लेम झाला असल्यानं ईपीएफओनं तारीख वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. (EPFO extends deadline to apply for higher pension for members till July 11)

EPFO Marathi News
Devraj Patel : भाई दिल से बुरा लगा है! प्रसिद्ध युट्युबर देवराज पटेलचा मृत्यू; काय घडलंय वाचा

EPFOच्या या पेन्शनसाठी खरंतर अर्ज करण्याची मुदत यापूर्वी दोनदा वाढवण्यात आली होती. सुरुवातीला याची अंतिम तारीख ३ मार्च होती. त्यानंतर ती वाढवत शेवटची तारीख २६ जून करण्यात आली. पण आता तिसऱ्यांदा पुन्हा एकदा याची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे. (Marathi Tajya Batmya)

EPFO Marathi News
Video: अंतराळात झालं ICC World Cup 2023च्या चषकाचं अनावरण! पाहा भन्नाट व्हिडिओ

काय आहे हायर पेन्शन?

हायर पेन्शन म्हणजे अधिक निवृत्तीवेतन. सन १९९६ मध्ये ईपीएफओच्या कायद्यात परिच्छेद ११ (३) मध्ये एक तरतुद टाकण्यात आली होती. त्यानुसार, ईपीएफओच्या सदस्यांना या तरतुदीनुसार, पेन्शन कॉन्ट्रिब्युशनमध्ये संपूर्ण वेतनात (बेसिक+डीए म्हणजेच महागाई भत्ता) ८.३३ टक्के वाढीला मंजुरी मिळाली होती.

जर तुम्ही हायर पेन्शनचा पर्याय निवडला तर सेवानिवृत्तीनंतर मिळणारी अंदाजित रक्कम कमी होते. पण पेन्शनमध्ये वाढ होते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, या स्कीममध्ये काही फायदे आहेत तसे तोटेही आहेत. (Latest Marathi News)

EPFO Marathi News
जगातील सर्वाधिक 10 प्रदुषित शहरं! भारताच्या तीन शहरांचा समावेश: Polluted Cities

हायर पेन्शनसाठी अर्ज कसा कराल?

यासाठी तुम्हाला ईसेवा पोर्टलवर जावं लागेल. त्यानंतर उजव्या बाजुला पेन्शन ऑन हाय सॅलरीचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लीक करा. त्यानंतर जे नवं पेज उघडेल तिथं दोन पर्याय मिळतील. जर तुम्ही १ सप्टेंबर २०१४ पूर्वी निवृत्त झाला असाल तर पहिला पर्याय निवडा.

तसंच जर तुम्ही सध्या नोकरीत असाल तर दुसरा पर्याय निवडा. पुढे तुम्हाला युएएन, नाव, जन्म तारीख, आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक असे डिटेल्स भरावे लागतील. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल, या ओटीपीद्वारे तुम्हाला नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.