नवी दिल्ली, : ‘‘पाकिस्तानशी चर्चा करण्याचे युग सरले असून त्या देशाला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल,’’ असे खडे बोल परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शेजारी देशाला सुनावले आहेत. एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी जयशंकर बोलत होते. ‘एससीओ’ परिषदेला हजर राहण्यासाठी पाकने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले आहे. या पार्श्वभूमीवर जयशंकर यांचे वरील वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.