तब्बल सहा वर्षानंतर अत्यावश्यक औषधांची यादी जाहीर; दर सामान्यांच्या अवाक्यात

mansukh mandaviya and bharti Pawar
mansukh mandaviya and bharti Pawar
Updated on

नवी दिल्ली - तब्बल सहा वर्षांनंतर अत्यावश्यक औषधांची नवी यादी जारी करण्यात आली आहे. या औषधांवर किंमतीची मर्यादा लागू असल्याने ते सर्वसामान्यांच्या खिशावर परडवणारे असणार आहेत. वास्तविक, 2015 नंतर तब्बल सहा वर्षांनी NELM (National Essential List of Medicines) मध्ये ही यादी जारी करण्यात आली आहे. 

mansukh mandaviya and bharti Pawar
सदाभाऊ खोत यांना उधारी मागणाऱ्याला अटक; उधारीसाठी अडवला होता ताफा

2015 नंतर 2022 मध्ये अपडेट करून NELM तुमच्या समोर असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले. तसेच औषधांच्या यादीसाठी लांबलचक प्रक्रिया आहे. त्यानंतर काही औषधांचा यामध्ये समावेश करण्यात येतो. यासाठी एक स्वतंत्र समिती निर्णय घेते. तसेच 350 तज्ज्ञांशी आणि 140 वेळा सल्लामसलत केल्यानंतर ही यादी तयार करण्यात आल्याचंही मांडविया यांनी सांगितलं.

ते पुढं म्हणाले की, या यादीमधील औषधे सुरक्षित, परवडणारी आणि उपलब्ध होणारी आहेत. NPPA औषधांची विक्री किंमत ठरवेल. त्यामुळे औषधांची अवास्तव किंमत वाढवता येणार नाही. 

mansukh mandaviya and bharti Pawar
Semicoductor Project: ‘निवडणुकीमुळे गुजरातचे हित जपण्यात महाराष्ट्र भाजप व्यस्त’

 केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती प्रवीण पवार यांनी सांगितले की ही यादी अत्यंत महत्त्वाची आहे. प्राथमिक, सेकंडरी आणि तृतीय पातळीवर उपचारासाठी महत्त्वपूर्ण आहे. तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, जी औषधे आपल्याकडे मान्यता प्राप्त आणि लासन्सप्राप्त आहेत, त्याच औषधांनी या यादीत सामील करण्यात आलं आहे. यादीत ३८४ औषधे असून ३४ औषधे नव्याने समाविष्ट करण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()