Loksabha Election Result : सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग! नितीश व चंद्राबाबू ठरणार किंगमेकर; मोदी व शहांनी केली बोलणी

भाजपला सरकार स्थापनेसाठी आवश्यक २७२ चा जादुई आकडा पार करता न आल्याने केंद्रात त्रिशंकू सरकार स्थापन होणार हे आता स्पष्ट झाले आहे.
nitish kumar and chandrababu naidu
nitish kumar and chandrababu naidusakal
Updated on

नवी दिल्ली - भाजपला सरकार स्थापनेसाठी आवश्यक २७२ चा जादुई आकडा पार करता न आल्याने केंद्रात त्रिशंकू सरकार स्थापन होणार हे आता स्पष्ट झाले आहे. यात बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख (टीडीपी) एन. चंद्राबाबू नायडू यांच्या भूमिका महत्त्वाच्या ठरणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या दोन्ही नेत्यांशी चर्चा केली आहे, तर ‘इंडिया’ आघाडीच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे या दोन्ही नेत्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

गेल्या दहा वर्षांपासून पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात भाजपचे बहुमताचे सरकार होते. परंतु आज ‘ईव्हीएम’च्या पेट्या उघडल्यानंतर ४०० पारचा दावा करणाऱ्या भाजपला २७२ हा बहुमताचा आकडाही पार करता आला नाही. दुपारी एकनंतर निकालाचा कल स्पष्ट होऊ लागल्यानंतर सरकार स्थापनेसाठी भाजपला दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांची गरज पडणार हे स्पष्ट झाले आहे.

यामुळे पंतप्रधान मोदी यांनी तत्काळ बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि टीडीपीचे नेते एन. चंद्राबाबू नायडू यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीसुद्धा या दोन्ही नेत्यांशी चर्चा केली. आंध्र प्रदेशमध्ये टीडीपीचे १६ खासदार विजयाच्या मार्गावर आहेत तर बिहारमध्ये जेडीयूचे १४ खासदार जिंकण्याच्या स्थितीमध्ये आहेत.

भाजपचे उमेदवार २४१ मतदारसंघात आघाडीवर होते. बहुमतासाठी २७२ हा जादुई आकडा पार करण्यासाठी अद्यापही भाजपला जवळपास ३० खासदारांची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले आहे.

इंडिया आघाडीत हालचाली

भाजप बहुमतापासून बरेच दूर असल्याचे लक्षात आल्यानंतर ‘इंडिया’ आघाडीने राजकीय खेळी खेळण्यास सुररवात केली आहे. आघाडीच्या नेत्यांची बैठक बुधवारी किंवा गुरुवारी होण्याची शक्यता आहे. यानंतर नितीश कुमार आणि एन. चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा करण्यावर विचार होणार आहे. शरद पवार बुधवारी दिल्लीमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांचे या दोन्ही नेत्यांशी सौहार्दाचे संबंध असल्याचे मानले जाते. मात्र, काँग्रेसला सरकार स्थापनेसाठी दावा करणे तेवढे सोपे नाही.

परंतु नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्याशिवाय भाजपला स्थिर सरकार देणे आता शक्य होणार नसल्याचेही आता स्पष्ट झाले आहे. यासाठी इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीनंतरच या दोन्ही नेत्यांशी चर्चा करावयाची की नाही, याचा निर्णय होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.