नवी दिल्ली - इथेनॉलवर (Ethanol) भर दिल्याने पर्यावरण (Environment) रक्षणाबरोबरच शेतकऱ्यांचे (Farmer) जीवनमान (Living Standard) उंचावण्यास मदत होईल. त्यामुळे पेट्रोलमध्ये (Petrol) २० टक्के इथेनॉल ब्लेंडिंग करण्याचे लक्ष्य २०३० ऐवजी २०२५ पर्यंत साध्य करण्याचा निर्धार सरकारने (Government) केला असल्याचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज सांगितले. (Ethanol will Raise the Living Standards of Farmers Narendra Modi)
पंतप्रधान मोदी यांनी आज पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विचार मांडले. सेंद्रिय शेती आणि कृषी क्षेत्रात बायोइंधनाचा वापर याबाबत पुण्यामधील एका शेतकऱ्याचे अनुभव त्यांनी जाणून घेतले. पंतप्रधानांनी देशभरात इथेनॉलचे उत्पादन आणि वितरण करण्यासाठी ई-१०० या महत्त्वाकांक्षी पथदर्शी प्रकल्पाचा पुण्यामध्ये प्रारंभ केला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नरेंद्र सिंग तोमर, प्रकाश जावडेकर, पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान देखील उपस्थित होते.
मोदी म्हणाले, ‘‘देशात २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल देण्याच लक्ष्य साध्य करण्याचा कालावधी आणखी पाच वर्षांनी कमी करण्यात आला आहे. २०१४ पर्यंत सरासरी केवळ १.५ टक्के इथेनॉल मिश्रण केले जायचे. ते आता ८.५ टक्क्यांवर गेले आहे. सुमारे ३८ कोटी लिटर इथेनॉल खरेदीचे प्रमाण ३२० कोटी लिटरपर्यंत पोहोचले आहे. इथेनॉल खरेदीमध्ये झालेल्या या आठपट वाढीमुळे देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे. देशातील इथेनॉल उत्पादन करणारे कारखाने चार पाच राज्यांमध्ये एकवटले आहेत. देशभरात याचा विस्तार करण्यासाठी अन्नधान्यावर आधारित डिस्टिलरी उभारल्या जात आहेत. शेतीमधील टाकाऊ पदार्थांपासून इथेनॉल बनवण्यासाठी देखील अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पां उभारणी केली जात आहे.’
मोदी म्हणाले...
सात वर्षात अपारंपरिक ऊर्जानिर्मिती क्षमता अडीचशे टक्यांपेक्षा अधिक वाढली
नवीन गुंतवणुकीच्या संधी, लाखो तरुणांना रोजगारही
हरित वाहतूक अभियानाला चालना मिळाली
मेट्रो रेल्वेसेवा ५ शहरांवरून १८ शहरांवर पोचली
रेल्वे जाळ्याच्या मोठ्या भागाचे विद्युतीकरण
सौर सुविधा असलेल्या विमानतळाची संख्या ५० हून अधिक
गुजरातमधील केवडिया हे इलेक्ट्रिक वाहनांचे शहर म्हणून विकसित केले जात आहे. ‘जलजीवन अभियाना’च्या माध्यमातून देशात जलस्रोतांची निर्मिती, संवर्धन यापासून ते जलस्रोतांचा वापर अशा समग्र दृष्टिकोनातून काम केले जात असून, एकीकडे प्रत्येक घराला पाइप जोडले जात आहे. दुसरीकडे अटल भूजल योजना आणि ‘कॅच द रेन’ मोहिमांद्वारे भूजल पातळी वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.