सर्वांनी तालिबानशी संवाद साधावा, मार्गदर्शन करावे

अमेरिकेबरोबर परराष्ट्र पातळीवरील चर्चेत चीनकडून आवाहन
अमेरिका-तालिबान
अमेरिका-तालिबान sakal
Updated on

बीजिंग : तालिबानशी सर्व घटकांनी संवाद साधावा आणि त्यांना मार्गदर्शन करावे असे आवाहन चीनने केले आहे. अमेरिकेबरोबरील परराष्ट्रमंत्री पातळीवरील चर्चेत ही भूमिका मांडण्यात आली. चीनने तालिबानला अधिकृत मान्यता देण्याची केवळ औपचारिकता पूर्ण केलेली नाही. या आवाहनाद्वारे तालिबानशी घनिष्ट संबंध प्रस्थापित करण्याचे स्पष्ट संकेत चीनने दिले. चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. त्यावेळी चीनकडून दूरगामी परिणाम साधणारे अनेक मुद्दे मांडण्यात आले. अमेरिकेच्या आमंत्रणावरून ही चर्चा झाल्याचे वृत्त आहे. (InterNational News)

चीनने म्हटले आहे की, अफगाणिस्तानमधील परिस्थितीत मूलभूत पातळीवर बदल झाला आहे. त्यामुळे सर्वांनी तालिबानशी संपर्क साधण्याची गरज निर्माण झाली आहे.

अमेरिका-तालिबान
जॅकलिन फर्नांडिसच्या मागे ईडी; तब्बल पाच तास कसून चौकशी

ना हिंसा थांबली, ना दहशतवाद...

अफगाणिस्तानात सैन्य पाठविण्याचा अमेरिका आणि नाटो देशांचा निर्णय सपशेल चुकल्याचा मुद्दाही वँग यांनी अधोरेखित केला. ब्लिंकन यांना त्यांनी सांगितले की, दहशतवादी शक्तींचा बीमोड करण्याचा उद्देश अफगाणिस्तानातील युद्धामुळे कधीही साध्य झाला नाही हे वस्तुस्थितीवरून सिद्ध होते. अमेरिका व नाटो देशांचे सैन्य घाईने माघारी परतल्यामुळे दहशतवादी गटांना ओके वर काढण्याची संधी मिळू शकेल.

द्विपक्षीय संबंधांवर चर्चा

वँग-ब्लिंकन चर्चेत द्विपक्षीय संबंधांचाही समावेश होता. अनेक मुद्द्यांवरून अडथळे निर्माण झाल्याने हे संबंध ताणले गेले आहेत. त्याविषयी वँग यांनी मार्मिक विधान केले. वादापेक्षा चर्चेचे माध्यम आणि संघर्षापेक्षा सहकार्य हे सरस पर्याय आहेत, असे त्यांनी नमूद केले. चीनविषयी अमेरिका कसा दृष्टिकोन ठेवते त्यानुसार चर्चेत सहभागी होण्याचा विचार करू असेही मग स्पष्ट केले.

अमेरिका-तालिबान
सुमीतची कमाल! एकाच मॅचमध्ये तब्बल तीन वेळा मोडला विश्वविक्रम

राजदूतांची यापूर्वीच चर्चा

अफगाणिस्तानचे धोरण आखताना चीनने आपला घनिष्ठ मित्र देश पाकिस्तानशी सातत्याने समन्वय ठेवला आहे. चीनचे अफगाणिस्तानातील राजदूत वँग यू यांनी तालिबानशी राजनैतिक पातळीवर यापूर्वीच चर्चा केली आहे. आतापर्यंत चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत.

प्रमुख देशांबरोबर ब्लिंकन यांची चर्चा

न्यूयॉर्क : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन हे अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर आज कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन, तुर्कस्तान आणि कतार या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांबरोबर दूर दृष्य प्रणालीच्या माध्यमातून चर्चा करणार आहेत. यात युरोपीय महासंघाचे सदस्यही उपस्थित राहतील. नजीकच्या भविष्यात अफगाणिस्तान आणि तालिबानबाबत कोणती संयुक्त भूमिका घ्यायची, यावर चर्चा होईल.

अमेरिका-तालिबान
चिंताजनक! लशींचे सुरक्षा कवच भेदणारा व्हेरिएंट आढळला

चीनचे मुद्दे

अमेरिकेने अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्याच्या आदर करावा

दहशतवाद व हिंसाचाराच्या मुकाबल्यात अफगाणिस्तानला मदतीसाठी ठोस कृती करावी

अफगाणिस्तानला तातडीने आवश्यक असलेली आर्थिक, उपजीविका आणि मानवतावादी मदत मिळावी म्हणून अमेरिकेने आंतरराष्ट्रीय समुदायाबरोबर कार्य करावे

अफगाणिस्तानातील नव्या राजकीय यंत्रणेला सरकारी संस्थांचे कामकाज सुरळितपणे चालविण्यास मदत करावी

सरकारला सामाजिक सुरक्षा व स्थैर्य राखता यावे, चलनवाढ आणि महागाई कमी करता यावी आणि लवकरात लवकर शांततापूर्ण फेरबांधणीची वाटचाल सुरु करता यावी म्हणून सहकार्य करावे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.