Rajiv Kumar on EVM: "ईव्हीएमचा जन्मच चुकीच्या मुहुर्तावर झाला, पुन्हा शिव्या..."; मुख्य निवडणूक आयुक्त असं का म्हणाले?

CEC Rajiv Kumar On EVM: लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता सत्तास्थापनेची तयारी सुरु झाली आहे.
CEC Rajeev Kumar
CEC Rajeev KumareSakal
Updated on

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता सत्तास्थापनेची तयारी सुरु झाली आहे. या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं नाही पण एनडीएला बहुमत असल्यानं मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. तर दुसरीकडं विरोधकांना अर्थात इंडिया आघाडीला २३४ जागा मिळाल्या आहेत.

या स्थितीमुळं भाजपला आता मित्र पक्षांशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही. दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ईव्हीएमवर भाष्य केलं आहे. ईव्हीएमचा जन्मच चुकीच्या मुहुर्तावर झालाय, त्यामुळं ते पुन्हा एकदा शिव्या खायला तयार असेल, असं उपोरधक विधान राजीव कुमार यांनी केलं आहे. (EVM was born at wrong time ready to insult again says CEC Rajiv Kumar

राजीव कुमार म्हणाले, "ईव्हीएमला थोडे दिवस आराम करु द्या, पुढच्या निवडणुकीपर्यंत त्याला आराम करु द्या. त्यानंतर ईव्हीएम मशि पुन्हा बाहेर काढू, त्याची बैटरी बदलू, पेपर बदलू. त्यानंतर ईव्हीएम पुन्हा एकदा शिव्या खाईल आणि पुन्हा खरा निकाल देईल. पण कदाचित या ईव्हीएमचा जन्मच चुकीच्या मुहुर्तावर झाला आहे. गेल्या २० ते २२ वर्षात ईव्हीएम बरोबर निकाल दाखवत आली आहे. मशिन खूपच विश्वसनीय आहे. ईव्हीएम सगळीकडून तटस्थ आहे आणि आपलं काम करत आहे"

लोकसभा निवडणूक महात्मा गांधींना समर्पित

लोकसभा निवडणूक हिंसामुक्त व्हाव्यात यासाठी त्या महात्मा गांधींना समर्पित करण्यात आल्या होत्या. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त ज्ञानेक कुमार आणि डॉ. सुखबीर सिंह संधू यांच्यासह राष्ट्रपती भवन इथं राष्ट्रपतींची भेट घेतली. यावेळी लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या कलम ७३ अंतर्गत भारतीय निवडणूक आयोगाद्वारे काढण्यात आलेल्या अधिसूचनेची एक प्रत राष्ट्रपतींकडं सुपूर्द केली. यामध्ये १८ व्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर निवडणून आलेल्या सदस्यांची नावं सहभागी आहेत. यानंतर कुमार यांनी महात्मा गांधी यांची समाधी राजघाटावर जाऊन अभिवादन केलं.

सामान्य जनतेच्या बुद्धीचं यश

निवडणूक आयोगानं म्हटलं की, "आम्ही अफवा आणि निराधार संशय घेणाऱ्या निवडणूक प्रतिक्रेला दुषित करणाऱ्या सर्व प्रयत्न फेटाळले. ज्यामुळं अशांतता पसरली असती, भारताच्या लोकशाही व्यवस्थेवर अत्यंत विश्वास असणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तीच्या इच्छा आणि बुद्धीचा हा विजय आहे. आम्ही स्वतंत्र, निष्पक्ष आणि सर्वसमावेशक निवडणूक कायम बनवण्यासाठी नैतिक आणि कायदेशीर रुपानं बांधिल आहेत"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()