अफगाणचे माजी राष्ट्राध्यक्ष करझाई यांची तालिबानसोबत चर्चा

अफगाणचे माजी राष्ट्राध्यक्ष करझाई यांची तालिबानसोबत चर्चा
Updated on

काबूल : तालिबान नेत्यांनी अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करजई यांची भेट घेतली आहे. त्यांची ही भेट काबूलमध्ये झाली आहे. यासोबतच त्यांनी अब्दुल्ला अब्दुल्ला याचीही भेट घेतली आहे. याबाबतचं वृत्त टोलो न्यूजने दिले आहे. तालिबानचा कमांडर आणि हक्कानी नेटवर्क या अतिरेकी गटाचा वरिष्ठ नेता अनस हक्कानी यांनी चर्चेसाठी अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांची भेट घेतली आहे, असं तालिबानच्या अधिकाऱ्यानं बुधवारी सांगितलंय. हक्कानीबरोबर प्राथमिक चर्चा करून नंतर तालिबानचा सर्वोच्च राजकीय प्रमुख मुल्ला अब्दुल घनी बरादर याच्याबरोबर वाटाघाटी करण्याचा करझाई यांचा प्रयत्न आहे.

अफगाणचे माजी राष्ट्राध्यक्ष करझाई यांची तालिबानसोबत चर्चा
Fact Check : अफगाणिस्तानच्या विमानातला गर्दीचा फोटो खरा की खोटा?
अफगाणचे माजी राष्ट्राध्यक्ष करझाई यांची तालिबानसोबत चर्चा
पुण्यात शिकणारा विद्यार्थी पाहतोय 'अफगाण'चा राष्ट्राध्यक्ष होण्याचं स्वप्न

काबूलमधून ३,२०० जण अमेरिकेत

वॉशिंग्टन : तालिबानच्या हातात अफगाणिस्तानची सूत्रे गेल्यापासून अमेरिकेने काबूलमधून ३,२०० हून अधिक जणांना विमानाद्वारे अमेरिकेत नेल्याची माहिती ‘व्हाइट हाउस’ने दिली आहे. अमेरिकेने आज काबूलमधून अमेरिकेच्या १,१०० नागरिकांना मायदेशी आणले. यासाठी त्यांनी विमानाच्या तेरा फेऱ्या केल्या. याशिवाय, दोन हजारांहून अधिक अफगाणी नागरिकांनाही अमेरिकेत आणल्याची माहिती यावेळी देण्यात आली. लष्कराच्या मालवाहू विमानात एका वेळी कमाल तीनशे जणांना बसवून काबूलमधून अमेरिकेत आणले जात आहे.

तालिबानबरोबर चर्चा करू : ‘ईयू’

ब्रुसेल्स : अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेतलेल्या तालिबानला मान्यता देण्याची युरोपीय महासंघाला (ईयू) कोणतीही घाई नसल्याचे त्यांच्या परराष्ट्र धोरण विभागाचे प्रमुख जोसेफ बोरेल यांनी स्पष्ट केले. अफगाणिस्तानात असलेल्या युरोपीय नागरिकांच्या आणि ‘ईयू’बरोबर काम केलेल्या अफगाणी नागरिकांच्या सुरक्षेबाबत तालिबान्यांबरोबर चर्चा करणार असल्याचेही बोरेल यांनी सांगितले. या सर्वांना युरोपात आणण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. अफगाणिस्तानमधून स्थलांतरीतांचे लोंढे बाहेर पडू नयेत, यासाठीही तालिबान्यांबरोबर चर्चा आवश्‍यक असल्याचे बोरेल म्हणाले.

अफगाणचे माजी राष्ट्राध्यक्ष करझाई यांची तालिबानसोबत चर्चा
डॅशिंग कार खेळल्यानंतर तालिबान्यांनी अम्युझमेंट पार्कचं पेटवून दिलं?

जी-७ देशांची लवकरच बैठक

लंडन : अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात जी-७ देशांची व्हर्च्युअल बैठक बोलावणार असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आज सांगितले. तालिबानी सत्तेबाबत कोणते धोरण आखावे, याबाबत या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे.

सरकार स्थापनेनंतर बघू : चीन

बीजिंग : अफगाणिस्तानमधील नवे सरकार सर्वसमावेशक आणि खुले धोरण असलेले असेल, अशी आशा चीनने आज व्यक्त केली. असे सरकार स्थापन झाल्यानंतर तालिबानी सत्तेला मान्यता देण्याबाबत विचार करू, असे चीन सरकारने आज स्पष्ट केले. ‘अफगाणिस्तानमधील सरकारला मान्यता देण्याचा प्रश्‍न असेल, तर सरकार आधी स्थापन होणे आवश्‍यक आहे,’ अशी प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिअन यांनी दिली. तसेच, चीनच्या शिनजिआंग प्रांतातील उईघुर मुस्लिमांना पाठबळ देऊ नये, असा इशाराही तालिबानला दिला आहे. तालिबानने अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करावी, असे आवाहनही लिजिअन यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.