Indian Army : जवानानं एकाच कुटुंबातील चौघांवर झाडल्या गोळ्या; आई-मुलगा ठार, सून-सासरे गंभीर जखमी

या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस तपास करत असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
Himachal Pradesh Crime News
Himachal Pradesh Crime Newsesakal
Updated on

सुजानपूर : हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) गोळीबाराच्या घटना घडत आहेत. ताजं प्रकरण हमीरपूर जिल्ह्यातील आहे. इथं एका निवृत्त जवानानं (Retired Soldier) एकाच कुटुंबातील 4 जणांवर गोळ्या झाडल्या. यात आई-मुलाचा मृत्यू झाला, तर सून आणि सासरे जखमी झाले.

सध्या पोलिसांनी आरोपी माजी सैनिकाला अटक केलीये. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना हमीरपूर जिल्ह्यातील (Hamirpur District) सुजानपूरच्या बगेहडा गावात घडलीये. शुक्रवारी सायंकाळी जमिनीच्या वादातून हा गोळीबार झाला. यात दोघांना आपला जीव गमवावा लागला असून इतर दोघांना गंभीर अवस्थेत हमीरपूर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

Himachal Pradesh Crime News
Sammed Shikhar : 'सम्मेद शिखर'साठी आणखी एका जैन साधूनं दिली प्राणाची आहुती; समर्थ सागर महाराजांचं निधन

वास्तविक, ही गोळीबाराची घटना शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. जमिनीवरून दोन कुटुंबात वाद होता. गोळीबारात जखमी झालेल्या अजित सिंग (66) यांनी सांगितलं की, माझी पत्नी विमला देवी (59) संध्याकाळी शेतात मिरची तोडत होती. यादरम्यान माझा शेजारी चंचल सिंग तिथं आला आणि त्यानं पत्नीवर गोळीबार केला. यामुळं ती जखमी होऊन खाली पडली.

Himachal Pradesh Crime News
Air India Case : विमानात महिलेच्या अंगावर लघवी करणाऱ्याचा Photo आला समोर; आरोपी बड्या कंपनीत आहे उपाध्यक्ष!

दरम्यान, बंदुकीचा आवाज ऐकून माझा मुलगा करण उर्फ ​​लकी (36) हाही बाहेर आला असता चंचलनं त्याच्यावरही गोळी झाडली. नंतर माझी सून ममता (32) हिच्यावरही आरोपीनं गोळ्या झाडून हत्या केली. गोळीबाराचा आवाज केल्यावर गावकऱ्यांनी तात्काळ अजितच्या मुलाला आणि सुनेला खासगी वाहनातून सुजानपूर रुग्णालयात पाठवलं. यादरम्यान रुग्णवाहिका आणि पोलिसांनाही माहिती देण्यात आली. आरोपी चंचल सिंगला पोलिसांनी घरातून अटक केलीये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()