भोपाळ: मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कोरोनासंदर्भातील भारताच्या परिस्थितीबाबत टीका केली आहे. भारताची जी प्रतिमा मलिन झाली आहे, त्याची भरपाई कोण करेल, असा प्रश्न पत्रकार परिषदेत त्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना कमलनाथ केंद्र सरकारवर आक्रमक झाले. त्यांनी मोदी सरकारवर टीका करताना म्हटलंय की, भारत महान नाही, तर भारत बदनाम झाला आहे. सगळ्या देशांनी बंदी घातलीय की भारताचे लोक त्यांच्या देशात येऊ शकत नाहीत. (Ex CM of Madhya pradesh Kamalnath says India is no longer great but infamous)
परदेशात जे भारतीय टॅक्सी चालवत आहेत, त्यांच्या टॅक्सीमध्ये देखील कुणी बसण्यास तयार नाहीये, असं सांगणाऱ्या टॅक्सी चालकाचा देखील फोन मला न्यूयॉर्कमधून आला होता. याप्रकारे मोदी सरकारने देशाला बदनाम केलं आहे. आणि असं असून मोदीजी म्हणत होते की आम्ही कोविडची लढाई जिंकली आहे. आपण जगातील फार्मसी हब आहोत. आणि आज ग्लोबल टेंडर काढून लस आणण्याची वेळ आली आहे, असंही ते पुढे म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.