Ex-Madhya Pradesh CM Kamal Nath Latest News : लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सध्या वेग आला आहे, यादरम्या काँगेस पक्षाला मात्र एकामागून एक झटके बसताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता मध्यप्रदेशात देखील माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांचे पुत्र नकुलनाथ लवकरच भाजपच्या गोटात सहभागी होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून याबद्दलच्या चर्चा सुरू आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कमलनाथ यांना आपले पुत्र नकुलनाथ यांच्या राजकीय भविष्याची चिंता आहे, कारण मागील लोकसभा निवडणूकीत मध्ये प्रदेश मध्ये काँग्रेसला फक्त एक जागा जिंकता आली होती, जी कमलनाथ यांचा गड मानला जाणाऱ्या छिंदवाडा येथील होती. येथे कमलनाथ यांचे चिरंजीव नकुलनाथ यांना मोठ्या संघर्षानंतर विजय मिळाला होता. छिंदवाडा येथे कमलनाथ किंवा नकुलनाथ यांच्या विजयाचे मार्जिन सातत्याने कमी होते आहे. तसेच भाजपने छिंदवाडा येथे विजय मिळवण्यासाठी मागील तीन वर्षात खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे कमलनाथ भाजपमध्ये सहभागी होण्याची शक्यता बळावली आहे.
मध्य प्रदेशचे भाजप प्रवक्ते आणि कमलनाथ यांचे माजी मीडिया सल्लाकार नरेंद्र सलूजा यांनी कमलनाथ-नकुलनाथ यांचा एक फोटो एक्सवर जय श्री राम लिहीत पोस्ट केला आङे. यानंतर कमलनाथ किंवा नकुलनाथ भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र अद्याप कमलनाथ किंवा नकुलनाथ तसेच भाजपकडून देखील याबद्दल अधिकृत घोषणा झालेली नाहीये. तसेच या चर्चांवर कुठलाही खुलासा देखील करण्यात आलेला नाहीये.
काँग्रेस नेत्याने फेटाळला दावा
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी कमलनाथ भाजपमध्ये सहभागी होणार असल्याचा दावा फेटाळला आहे. ते म्हणाले की माझं काल रात्री कमलनाथ यांच्याशी बोलणं झालं. ते छिंदवाडा येथे आहेत. ज्या व्यक्तीने आपल्या राजकीय जीवनाची सुरूवात नेहरू गांधी परिवारासोबत केली, तो व्यक्ती इंदिरा यांचे कुटुंब सोडून जाईल अशी अपेक्षा कशी करू शकता. आपण असा विचार देखील करू नये.
कमलनाथ छिंदवाडा येथून ९ वेळा लोकसभा निवडणूक जिंकले आहेत. तर मागील दोन वेळा छिंदवाडा येथून आमदार देखील राहिले आहेत. त्यांचे पुत्र नकुलनाथ छिंदवाडा येथून खासदार आहेत. कमलनाथ डिसेंबर २०१८ आणि मार्च २०२० च्या दरम्यान मुख्यमंत्री राहिले आहेत. ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील राहिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.