भाईचाऱ्याचे दर्शन! आधी कुराण, नंतर रथोत्सव; चेन्नाकेशव मंदिरातील परंपरा

हिंदू-मुस्लिम एकीचे दर्शन ! कुराण वाचल्याशिवाय देवाचे रथ ओढले जात नाही.
Quran
Quran esakal
Updated on

बंगळूरु : कर्नाटकमध्ये (Karnataka) नुकतेच सांप्रदायिक तणावाच्या घटनांदरम्यान धार्मिक सलोख्याचे उदाहरण पाहायला मिळत आहे. हसन जिल्ह्यातील बेलूर येथील चेन्नाकेशव मंदिराने अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा जिवंत ठेवली आहे. येथील रथोत्सवाची सुरुवात कुराण (Quran) वाचून केली जाते. परंपरेनुसार डोड्डा मेदुरुचे खाजी सय्यद सज्जाद बाशा यांनी १३ एप्रिल रोजी दोन दिवसीय रथोत्सवाच्या पहिल्या दिवशी कुराण वाचले. त्यानंतर रथ ओढण्यात आले. येथील अधिकाऱ्यांनुसार, हे स्पष्ट नाही की मंदिराच्या यात्रेत कुराण केव्हापासून वाचायला सुरुवात झाली. ते म्हणाले, की मात्र मंदिर नियमावली १९३२ ची आहे. त्यात या परंपरेविषयी उल्लेख आहे. त्याचे आजपर्यंत पालन केले जात आहे. (Example Of Harmony Quran Reading After Hindu Rath Ustav Starts In Karnataka)

Quran
आनंद महिंद्रा यांनी आदित्य ठाकरे यांचे केले कौतुक, म्हणाले...

रथोत्सवात हजारो लोक जमा झाले होते. त्यात भगवान विष्णुच्या अवतारांपैकी एक भगवान चेन्नाकेशवाला रथात घेऊन जाताना दिसले होते. बाशा यांनी मंदिराचे अधिकारी, स्थानिक नेते आणि लोकांच्या उपस्थितीत कुराण वाचले होते. बाशा म्हणाले, की मी गेल्या ५० वर्षांपासून या उत्सवाप्रसंगी कुराण वाचतो. ही प्रार्थना केली जाते, की चेन्नाकेशव स्वामी सर्वांचे चांगले करो. हिंदू असो ख्रिश्चन अथवा मुसलमान सर्वांनी मिळून शांततेत राहायला हवे. आपल्यात कोणतेही मतभेद असू नये. कार्यक्रमात सहभागी झालेले माजी मंत्री तथा जनत दलाचे (धर्मनिरपेक्ष) आमदार एच.डी.रेवन्ना म्हणाले, की ही परंपरा शतकांपासून चालत आलेली आहे. (Hindu-Muslim Unity)

Quran
औरंगाबादमधील राम नवमी मिरवणुकीचा Viral Video; मशिदीजवळून जाताना 'भाईचारा'

ती चालू ठेवली पाहिजे. ते म्हणाले, सर्व समुदाय हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सर्वांना एकत्र शांततेत राहायला हवे. कदाचित हाच तो उद्देश असू शकतो. त्याबरोबर परंपरा सुरु करण्यात आले होते. कोणत्याही शक्तीला आपल्यात फुट पाडण्याची परवानगी देऊ नये. एका स्थानिक रहिवाशीने सांगितले, की कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले नव्हते. मात्र यंदा सर्व परंपराचे पालन करत हा उत्सव भव्य साजरा करण्यात आला. गेल्या काही महिन्यांमध्ये सांप्रदायिक तणावाच्या काही घटनासमोर आल्या आहेत. त्याची सुरुवात हिजाब वादापासून झाली होती. त्यानंतर हिंदू यात्रोत्सवात बिगर हिंदू व्यापाऱ्यांवर निर्बंध लावण्याचे आवाहन केले गेले आणि पुन्हा हलाल मटणावर बहिष्कार टाकणे आणि मशिदींवरील भोंगे बंद करण्याची मोहिम चालवण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.