Excise 'Scam': सिसोदिया, के. कविता यांच्या अडचणीत वाढ; न्यायालयीन कोठडीत झाली वाढ

Excise 'scam': दिल्लीतील मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी आप नेते मनीष सिसोदिया तसेच बीआरएसच्या नेत्या के. कविता यांच्या कोठडीत विशेष न्यायालयाने २५ जुलैपर्यंत वाढ केली आहे.
Excise 'Scam'
Excise 'Scam'Esakal
Updated on

नवी दिल्ली: दिल्लीतील मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी आप नेते मनीष सिसोदिया तसेच बीआरएसच्या नेत्या के. कविता यांच्या कोठडीत विशेष न्यायालयाने २५ जुलैपर्यंत वाढ केली आहे. आभासी माध्यमातून दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.

‘‘दिल्ली सरकारने नवे धोरण लागू केले, त्यावेळी सिसोदिया हे उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री होते. मद्य वितरकांच्या लॉबीला फायदा मिळावा यासाठी नवे धोरण तयार करण्यात आले,’’ असा तपास संस्थांचा आरोप आहे. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना २६ फेब्रुवारी २०२२ रोजी सीबीआयने अटक केली होती.

Excise 'Scam'
Parliament Session 2024: पहिल्या संसदीय अधिवेशनाची कडवट सांगता

या वर्षी मे महिन्यात उच्च न्यायालयाने सिसोदिया यांना जामीन देण्यास नकार दिला होता. सिसोदिया यांनी इलेक्ट्रॉनिक पुरावे नष्ट केले असल्याची टिपणी त्यावेळी न्यायालयाने केली होती. मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेही सध्या तिहार तुरुंगात आहेत.

Excise 'Scam'
Manish Sisodia News : जामिनासाठी मनीष शिसोदियांची सर्वोच्च न्यायालयात धाव; याचिकेवर उद्या होणार सुनावणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.