Inflation: इंधन,गॅस, खाद्यान्नांसह सारेच महागलं; महागाईने जनता त्रस्त

सर्व जीवनावश्यक वस्तूंचे तसेच खाद्यपदार्थांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
Inflation
InflationSakal
Updated on

महागाईने आता कळस गाठला आहे. मध्यमवर्गीय आणि हातावर पोट असणाऱ्यांचे जगणे कठीण झाले. दररोजच्या ताटात आवश्यक असलेल्या खाद्यपदार्थांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. चांगल्या प्रतीचा गहू ४५ तर कमी दर्जाचा ३० रुपये किलो झाला आहे. खाद्यतेलाचे भाव १६०ते १८५ च्या दरम्यान आहेत.

शासकीय गोदामात दोन वर्षे पुरेल एवढा गव्हाचा साठा असल्याचे दावे सरकार करीत आहे तर मग गहू एवढा महाग का विकल्या जात आहे? दोन-तीन महिन्यांपूर्वी ३० रुपये किलो असलेला चांगल्या प्रतीचा गहू ४५ च्या आसपास पोहचला आहे. गरीब जो गहू १८ ते २० रुपये किलोने विकत घेत होता त्याचे दर २६ रुपये झाले आहेत. सोयाबीनचे खाद्यतेल किरकोळमध्ये १६० ते १८५ च्या दरम्यान विकले जात आहे. डाळींही शंभरीपार झाल्या. सध्या लालमिरच्यांचा हंगाम आहे. याच काळात नागरिक वर्षभर पुरेल एवढ्या मिरच्या घेऊन ठेवतात. पण मिरच्यांचे दर १७० ते २६० रुपये किलो झाले आहेत. (Expensive including fuel, gas, food; Inflation plagues the masses)

Inflation
महागाई : एफएमसीजी कंपन्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याच्या तयारीत!

भारताकडे गव्हाचा प्रचंड साठा आहे. एक एप्रिल रोजी फूड कार्पोरेशन ऑफ इंडियाकडे ७.४६ दशलक्ष मेट्रिक टन गव्हाचा साठा आवश्यक असतो. विद्यमान स्थितीत एकूण साठा २३.४ दशलक्ष मेट्रिक टन एवढा आहे. त्यातील काही साठा निर्यात करणे भारताला सहज शक्य आहे. येत्या वर्षातील गव्हाच्या उत्पादनाने या साठ्यात भरच पडणार असल्याने तातडीने निर्यातीस प्रोत्साहन देण्यात येणार आहे. परिणामी, भारताच्या गंगाजळीत विदेशी मुद्रा येणार आहे. याशिवाय हरभरा डाळीच्या दरातही मागणी वाढल्याने प्रति किलो १५० रुपयांची वाढ झाली आहे. तूर डाळ, तांदूळ आणि तेलाचे दर स्थिरावलेले आहेत. हरभऱ्याची सरकार हमी भावाने खरेदी करीत असल्याने भाव वाढ झालेली आहे. तसेच नवीन गव्हासह डाळींची मागणी वाढणार असल्याचा अंदाजही नागपूर किरकोळ किराणा संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केला.

Inflation
किरकोळ महागाई आठ महिन्यांच्या उच्चांकावर, घाऊक महागाईतही वाढ

इंधनदरवाढीचा फटका-

पेट्रोल, डिझेल वाढत असल्याने वाहतूक खर्चही वाढला आहे. परिणामी फळे आणि भाजीपाल्यांचे दर भडकले आहेत. स्वयंपाकाचा गॅसही आता १०५१ रुपये झाल्याने सामान्य नागरिक रडकुंडीला आले आहेत.

चांगला गहू ४५ तर निम्न प्रतीचा ३० रुपये किलो

खाद्यतेल १६० ते १८५, डाळीही शंभरीपार

लालमिर्ची १७० ते २६०; चनाडाळीच्या दरातही वाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()