Omicron चा सर्वाधिक धोका कोणाला? वाचा तज्ज्ञांचं मत

How To Protect From Omicron Variant
How To Protect From Omicron VariantE sakal
Updated on

नवी दिल्ली : सध्या जगभरात ओमिक्रॉनचे संकट आहे. भारतात देखील ओमिक्रॉन रुग्णांची (India Omicron Cases) संख्या ३५८ वर पोहोचली आहे. तसेच डेल्टापेक्षा ओमिक्रॉनची संक्रमण क्षमता जास्त असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) सांगितलं आहे. पण, ओमिक्रॉनपासून स्वतःचा बचाव कसा करायचा? (How To Protect From Omicron) आणि ओमिक्रॉनचा सर्वाधिक धोका कोणाला आहे? (Who is High Risk of Omicron) असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. त्याचीच उत्तर आज आपण जाणून घेऊयात.

How To Protect From Omicron Variant
देशात ओमिक्रॉनचे १७०० रुग्ण; महाराष्ट्रात 500 पेक्षा जास्त

ओमिक्रॉनचा सर्वाधिक धोका कोणाला? -

डेल्टासारखाच ओमिक्रॉनचा प्रभाव असेल की नाही हे अद्यापही सिद्ध झालेलं नाही. पण, ओमिक्रॉन रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट बघता सर्वाधिक धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील तज्ज्ञ आणि विषाणूशास्त्रज्ञांनी ओमिक्रॉनची तीव्रता कशी टाळता येईल याबाबत सल्ला दिला आहे. विषाणूशास्त्रज्ञ डॉ. लान लिप्कीन यांनी लसीकरण न झालेल्या लोकांबदद्ल भीती व्यक्त केली आहे. ज्यांचे लसीकरण झालेले नाही आणि ज्यांना यापूर्वी संसर्ग झालेला नाही अशा लोकांना ओमिक्रॉनचा धोका जास्त असल्याचे डॉ लान लिप्किन म्हणाले. तुमचे लसीकरण झाले नसेल आणि यापूर्वी तुम्हाला संसर्ग झाला नसेल तर ओमिक्रॉनचा गंभीर धोका होण्याची शक्यता आहे. पण, याउलट ज्यांचे लसीकरण झालेले असेल किंवा ज्यांनी बूस्टर डोस घेतला असेल त्यांना ओमिक्रॉनची लागण झाल्यास सौम्य लक्षण दिसू शकतात, असंही लिप्कीन म्हणाले.

यापूर्वी कोरोना संसर्ग झाला असेल तर ओमिक्रॉनचा धोका किती? -

जर तुम्हाला यापूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला असेल आणि तुमचं लसीकरण पूर्ण झालं असेल किंवा तुम्ही कोविशिल्ड किंवा आरएनए तंत्रज्ञाचा वापर करून बनवलेल्या लशीचा बूस्टर डोस घेतला असेल तर तुम्हाला ओमिक्रॉनची लागण होऊ शकते. पण, त्याची लक्षण सौम्य असतील, असंही लिप्कीन सांगतात.

स्वतःचा बचाव कसा करायचा? -

लोकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळावे आणि डबल मास्कचा वापर करावा. N95 किंवा CAN95 या मास्कचा वापर करावा. अनेकांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. मात्र, त्यापैकी अनेकजणांना कुठलंही लक्षण दिसलं नाही. त्यामुळे अशा व्यक्तींपासून बचाव करणं गरजेचं आहे. त्यामुळे कुठला मास्क वापरायचा? याबाबत आपण अधिक दक्षता बाळगायला पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.