नवी दिल्ली, अरुणाचल प्रदेशमधील अधिक जोखीम असलेल्या सहा हिमसरोवरांची तपासणी करण्यासाठी प्रथमच तज्ज्ञांची दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. ही हिमसरोवरे पूर्ण भरून पूर येण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन या पथकांकडून उपाययोजना केली जाईल.
अरुणाचल प्रदेशातील २७ सरोवरांची राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने अधिक जोखीम असलेले तलाव म्हणून जाहीर केले आहे. यापैकी सहा हिमसरोवरांची तपासणी करण्यात येणार असून राज्यातील तवांग आणि दिबांग खोरे जिल्ह्यातील प्रत्येकी तीन हिमसरोवरांचा यात समावेश आहे. यापैकी दोन हिमसरोवरे समुद्रसपाटीपासून ११ हजार फूट उंचीवर आहेत.
तवांगमधील पथकाचे नेतृत्व कांकी दरांगचे उपायुक्त करत असून मागो परिसरातील हिमसरोवराचा अभ्यास करण्यासाठी हे पथक १९ तारखेलाच रवाना झाले आहे. त्याचप्रमाणे, झांग आणि झेमिथांग या उपविभागांतील आणखी दोन हिमसरोवरांची तपासणीही पथकाकडून केली जाईल.
दुसऱ्या पथकाचे नेतृत्व दिबांग खोरे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कबांग लेगो करत असून दोन हिमसरोवरांची तपासणी करण्यासाठी ते अनिनी येथे रवाना झाले आहे. येथील हिमसरोवराची कमी जोखमीच्या ‘सी’ श्रेणीत वर्गवारी केली आहे. मात्र, धोका वाढून सरोवर फुटण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याचीही तपासणी करण्यात येईल. कमी जोखमीच्या पहिल्या दोन हिमसरोवरांच्या तपासणीसाठी १२ दिवस लागण्याची शक्यता असून त्यानंतर सर्वाधिक धोकाअसलेल्या ‘ए’ श्रेणीतील हिमसरोवरांची तपासणी होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.