Explained: दिल्ली आणि एनसीआर भागात वारंवार भूकंपाचे धक्के का जाणवतात? जाणून घ्या

Explained why is the national capital experiencing tremors so frequently Nepal magnitude
Explained why is the national capital experiencing tremors so frequently Nepal magnitude
Updated on

नवी दिल्ली- नेपाळमध्ये ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे दिल्ली आणि जवळच्या भागातील नागरिकांमध्ये भीती पसरली. अनेक नागरिकांनी शुक्रवारची रात्र घर सोडून खुल्या मैदानात घालावली. गेल्या एक महिन्यात तीनवेळा दिल्लीमध्ये भूकंपाचे सौम्य प्रकारचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे दिल्लीमध्ये वारंवार असे भूकंपाचे धक्के का जाणवताहेत असा प्रश्न पडतो.

दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) झोन-४ मध्ये येते. ब्युरो ऑफ इंडियन स्टॅन्डर्सच्या माहितीनुसार, झोन-४ हा जास्त भूकंपप्रवण झोनमध्ये मोडतो. झोन-४ मध्ये मध्यम ते जास्त तीव्रतेच्या भूकंपाचे प्रमाण जास्त असते. (Explained why is the national capital experiencing tremors so frequently Nepal magnitude)

दिल्ली झोन-४ मध्ये कशामुळे येते

राजधानी दिल्ली ही हिमालयाच्या पर्वतरांगापासून २०० ते ३०० किलोमीटर अंतरावर आहे. हिमालयाची निर्मिती ही सातत्याच्या भारतीय आणि युरेशियन टेक्टॉनिक प्लेटच्या धडकेमुळे निर्माण झाली आहे. सातत्याने ही धडक सुरु असल्याने वारंवार जमिनीचे थरथरणे निर्माण होत असते. दिल्लीचे भौगोलिक स्थान या भागामध्ये पडत असल्याने येथे भूकंपाचे धक्के सातत्त्याने जाणवत असतात.

पृथ्वीच्या सर्वात वरच्या भागात असलेल्या टेक्टॉनिक प्लेटच्या हालचालींमुळे भूकंप निर्माण होत असतात. जास्त हालचाली म्हणजे भूकंपाची शक्यता जास्त. हिमालयाच्या टेक्टॉनिक प्लेटच्या सीमेजवळ दिल्ली येत असल्याने येथे भूकंपाची जास्त शक्यता असते. असे असले तरी दिल्ली मेजर फॉल्ट लाईनवर येत नाही. तर भूकंपाच्या सक्रिय भागामध्ये येते.

याच कारणामुळे नेपाळ, उत्तराखंड आणि जवळपासच्या प्रदेशांना भूकंपाचा सर्वात जास्त धोका असतो. याच भागात ८.५ रिश्टर स्केलपर्यंतच्या भूंकपांची नोंद झाली आहे. हिमालयाच्या जवळ असल्याने दिल्लीचा झोन-४ मध्ये ठेवण्यात आलं आहे. जे प्रदेश झोन-५ मध्ये येतात त्यांना भूकंपाचा सर्वाधिक धोका असतो.

Explained why is the national capital experiencing tremors so frequently Nepal magnitude
Nepal Earthquake : विनाशकारी भूकंपात नेपाळ उद्ध्वस्त; तब्बल 128 जणांचा मृत्यू, भारतातही जाणवले जोरदार धक्के

दिल्लीतील बांधकामे

दिल्लीच्या भौगोलिक स्थानाव्यतरिक्त दुसऱ्या काही कारणामुळे भूकंपाचा राजधानीला जास्त धोका आहे. दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. शिवाय त्यांचे बांधकाम भूकंपाच्या धक्क्यांना गृहित धरुन केलेलं नाही.

यमुना आणि हिंदोन नदीच्या किनाऱ्यावर अनेक ठिकाणी घरे बांधण्यात आली आहे. याठिकाणी टोलेजंग इमारती देखील उभारण्यात आली आहे. भविष्यात एक मोठ्या भूकंपाची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलीये. अशावेळी दिल्लीला मोठे नुकसान सोसावे लागू शकते. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.