Explainer: 4 राज्यांच्या निकालाचा महाराष्ट्रावर काय होणार परिणाम? तज्ज्ञ काय सांगतात?

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजप सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत आली आहे
ELETION RESULT
ELETION RESULT
Updated on

मुंबई- चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजप सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत आली आहे. तर, तेलंगणामध्ये काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. या पार्श्वभूमीवर चार राज्यांच्या निकालाचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर काय होणार हे तज्त्रांकडून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करुया. (4 states assembly election results 2023 effect on Maharashtra politics What experts say)

एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण, तो अंदाज सपशेल खोटा ठरलाय. तसेच छत्तीसगडमधील निकाल हा अनपेक्षित असल्याचं बोललं जातं. चारही राज्यांमध्ये मोदी ब्रँड हाच प्रभावी ठरला असून त्यांची जादू अद्याप कायम असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

ELETION RESULT
Chhattisgarh Election result: छत्तीसगडमध्ये भाजपचा विजय; वाचा दिवसभरातील घडामोडी

राजकीय विश्लेषक मृणालिनी नानिवडेकर म्हणाल्या की, गेल्या काही दिवसांपासून भाजप महाराष्ट्रात गोंधळलेल्या स्थितीत गेला होता. आता हा गोंधळ संपेल आणि भाजपला बुस्ट मिळेल. येत्या निवडणुकांमध्ये भाजप जास्त जागांवर दावा सांगू शकतो. तसेच मराठा आंदोलनाच्या मुद्द्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिक सक्षमपणे पुढे आले होते. पण, सध्या भाजपची लाट आहे आणि आपण त्याचे लाभार्थी आहोत अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकते.

निवडणुकांच्या निकालामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढणार आहे. त्यामुळे येत्या काळात भाजप आणखी आक्रमक होऊ शकते. जागा वाटपाबाबतही भाजपची तडजोड शक्ती वाढू शकते. अधिकाधिक जागांसाठी भाजप आग्रह करु शकतो. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना देखील आता भाजपच्या कलानुसार घ्यावे लागणार आहे, असं नानिवडेकर म्हणाल्या.

चार राज्यांच्या निवडणूक प्रचारामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रचारसभा घेतल्या होत्या. याचा त्यांना लाभ होणार आहे. तसेच केंद्रीय नेतृत्वाचा त्यांच्यावरील विश्वास वाढणार आहे. शिवाय, गेल्या काही दिवसांत देवेंद्र फडणवीस राज्यात सावध भूमिकेत गेले होते. पण, त्यांना नवी उर्जा मिळू शकते. भाजपकडून अजित पवार गटाला ताकद दिली जाऊ शकते. अशावेळी एकनाथ शिंदे यांना भाजपचं ऐकावं लागू शकतं, असंही त्या मिळाल्या.

ELETION RESULT
Rajasthan Results : राजस्थानमध्ये १९९ जागांपैकी ११५ जागांवर भाजप विजयी; दिवसभरातील निकालाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर...

मुंबई विद्यापीठाच्या जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागचे माजी विभागप्रमुख ड़ॉ. संजय रानडे यांच्याशी आम्ही संवाद साधला. ते म्हणाले की, चार राज्यांच्या निकालाचा फारसा परिणाम राज्यावर पडणार नाही. कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये यामुळे उर्जा नक्की निर्माण होईल, पण यापेक्षा अधिक काही होईल असं म्हणता येणार नाही. प्रत्येक राज्यातील निवडणुकांचे समीकरण वेगवेगळे असते.

छत्तीसगड, मध्य प्रदेशमधील विजयामध्ये मोदी ब्रँड उपयोग ठरला हे मान्य करावे लागेल. तसेच, राजस्थानमधील जनतेने सत्तांतराची पंरपरा यंदाही कायम ठेवली आहे. त्यामुळे यात जास्त काही आश्चर्यकारक आहे असं म्हणता येणार नाही. मात्र, तीन राज्यांत सत्ता असण्याचा फायदा भाजपला लोकसभेच्या निवडणुकीसाठी करुन घेता येईल, असं रानडे म्हणाले. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.