Explainer: ताज्या निकालांमुळे 'इंडिया आघाडी'वर काय होणार परिणाम? काँग्रेस बदलणार रणनीती!

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. छत्तीगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये भाजप सरकार स्थापन करेल असे चित्र आहे, तर तेलंगणामध्ये काँग्रेसची सत्ता येईल.
India Alliance
India AllianceEsakal
Updated on

नवी दिल्ली- चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. छत्तीगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये भाजप सरकार स्थापन करेल असे चित्र आहे, तर तेलंगणामध्ये काँग्रेसची सत्ता येईल. निकालांमुळे काँग्रेसला मोठा धक्का बसलाय.

काँग्रेसला किमान तीन राज्यांत सत्तेत येण्याची अपेक्षा होती, पण तसं झालेलं नाही. यामुळे येत्या काळात काँग्रेसला आपली रणनीती बदलावी लागणार आहे. (Explainer Assembly election result 2023 in four state how will effect india alliance aaghadi congress)

काँग्रेसने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका स्वत:च्या जिवावर लढल्या होत्या. इंडिया आघाडीला दूर ठेवलं होतं. पण, आता पराभवामुळे काँग्रेसला इंडिया आघाडीची गरज प्रकर्षाने जाणवणार आहे. तसेच भाजपचा पराभव करायचा असेल तर इंडिया आघाडीला एकत्र येऊन जोर लावावा लागेल यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

अखिलेश यादव यांची नाराजी भोवली

इंडिया आघाडीत समावेश असून देखील अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने मध्य प्रदेशमध्ये स्वतंत्र निवडणूक लढली होती. त्यांनी ७४ जागांवर निवडणूक लढवली. त्यांनी काँग्रेसमधून काही जागा मागितल्या होत्या. पण, काँग्रेसने जागा देण्यास नकार दिला होता. काँग्रेसला एमपीमध्ये एकहाती विजयाची खात्री होती, पण हा विश्वास पक्षाला नडला असल्याचं बोललं जातं.

India Alliance
Rajasthan Results : राजस्थानमध्ये १९९ जागांपैकी ११५ जागांवर भाजप विजयी; दिवसभरातील निकालाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर...

सपाच्या उमेदवारांनी मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला नुकसान पोहोचवले आहे. काँग्रेसने अखिलेश यांना सोबत घेऊन निवडणूक लढवली असती तर चित्र वेगळं असतं अशी चर्चा सुरु झाली आहे. नितीश कुमार हेही काँग्रेसवर काहीसे नाराज असल्याची चर्चा होती. काँग्रेस सध्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर चर्चा केली जाईल असं ते म्हणाले होते.

इंडिया आघाडीची बैठक

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ६ डिसेंबर रोजी इंडिया आघाडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पराभवाची कारण मिमांसा आणि लोकसभेसाठी नवीन रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे. ताज्या निकालांमुळे इंडिया आघाडीवर काही परिणाम पडेल काय? अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

India Alliance
Chhattisgarh Election result: छत्तीसगडमध्ये भाजपचा विजय; वाचा दिवसभरातील घडामोडी

नितीश कुमारांची ताकद वाढणार

काँग्रेसच्या पराभवामुळे जेडीयूच्या नितीश कुमार यांची बार्गेनिंग पॉवर आणि आघाडीतील महत्व वाढणार आहे. नितीश कुमार यांच्याकडे इंडिया आघाडीचे नेतृत्त्व देण्याबाबत दबाव वाढू शकतो. नितीश कुमार यांनी स्वत:ला पंतप्रधान पदाच्या शर्यतीपासून दूर ठेवलं आहे. पण, ते इंडिया आघाडीचं नेतृत्त्व करण्यास पुढे येऊ शकतात.

काँग्रेसच्या पदरी निराशा

हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमधील विजयामुळे काँग्रेसचा उत्साह वाढला होता. पण, ताज्या निकालामुळे उत्तर भारतात काँग्रेस मागे पडत असल्याचं चित्र आहे. काँग्रेसची क्षमता कमी झाल्याने ममता बॅनर्जी, शरद पवार, अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव यासारखे नेते इंडिया आघाडीतील काँग्रेसच्या नेतृत्वाला आव्हान देऊ शकतात.

पाच राज्यांच्या निकालानंतर आता काँग्रेसेत्तर पक्षांची बार्गेनिंग ताकद वाढणार आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला अनेक जागांवर पाणी सोडावे लागू शकते. महाराष्ट्रात देखील काँग्रेसला पडती बाजू घ्यावी लागू शकते.

India Alliance
Telangana Results 2023 : तेलंगणामध्ये काँग्रेसने जिंकल्या ६४ जागा; दिवसभरातील निकालाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर...

जातीनिहाय जनगणना

जातीनिहाय जनगणना निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरेल अशी आशा इंडिया आघाडीला होती. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी ही मागणी लावून धरली होती. पण, चार राज्यांच्या निकालामुळे हा मुद्दा प्रभावी न ठरल्याचं चित्र आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला जातीनिहाय जनगणनेला किती महत्त्व द्यायचं हे ठरवावं लागेल. तसेच 'रेवडी' योजना निकालामध्ये किती महत्त्वाच्या ठरत आहेत? याबाबत इंडिया आघाडीला अभ्यास करावा लागणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.