Uttar Pradesh Fire: उत्तर प्रदेशमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; चार जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Uttar Pradesh Fire Video: उत्तर प्रदेशातील कौशांबी येथे फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. स्फोटानंतर लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Uttar Pradesh Fire Video
Uttar Pradesh Fire VideoEsakal
Updated on

उत्तर प्रदेशातील कौशांबी येथे फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. स्फोटानंतर लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण गंभीर भाजले आहेत. जखमींना रुग्णवाहिकेच्या साहाय्याने मांझनपूर जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. कोखराज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भरवारी येथील आहे, जिथे फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाल्यानंतर लागलेल्या आगीत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे.

Uttar Pradesh Fire Video
Dhule News : आगीच्या अफवेने बाजारपेठेत धावपळ; सराफ बाजाराकडे बंब वळविण्यासाठी तब्बल अर्धा तास

या घटनेत शिवनारायण, कौसर अली, शाहिद अली आणि अन्य एकाचा मृत्यू झाला आहे. शराफत अली असे कारखान्याच्या मालकाचे नाव आहे.

4-6 जण जखमी झाल्याची माहिती

कौशांबीचे एसपी ब्रिजेश कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले की, फटाका कारखान्याला लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत, तर काहींची प्रकृती गंभीर आहे. हा कारखाना रहिवासी भागाच्या बाहेर आहे, त्यामुळे रहिवासी भागात कोणतेही नुकसान झालेले नाही.फक्त तेथे काम करणाऱ्या लोकांचा मृत्यू झाला आहे अनेक जण जखमी झाले आहेत. ज्याच्याकडे कारखाना होता त्याच्याकडे फटाके बनवण्याचा आणि विकण्याचा परवाना होता. 4-6 जण जखमी झाले आहेत.

Uttar Pradesh Fire Video
Burning Truck : पुणे नाशिक महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार; आग विझवण्यात यश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.