Export : गेल्या वर्षभरातनिर्यातीत भरघोस वाढ! वाणिज्य मंत्रालयाकडून आकडेवारी जाहीर

गेल्या मे २०२४ या महिन्यात निर्यातमध्ये १०.२५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. परंतु गेल्या वर्षभरात ही वाढ सरासरी ९.२१ टक्के एवढी होती.
exports increased by more than 9 percent during  tenure of Modi government in last few years
exports increased by more than 9 percent during tenure of Modi government in last few years
Updated on

नवी दिल्ली, ता. १४ः गेल्या वर्षांत नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात निर्यातीमध्ये नऊ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने दिली. या संदर्भात विविध विभागांमध्ये झालेल्या निर्यात वाढीची आकडेवारी वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केली आहे.

गेल्या मे २०२४ या महिन्यात निर्यातमध्ये १०.२५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. परंतु गेल्या वर्षभरात ही वाढ सरासरी ९.२१ टक्के एवढी होती. यासंदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचे सचिव सुनील बर्थवाल यांनी मंत्रालयात पत्रकारांना सविस्तर माहिती दिली. व्यापारी निर्यातीमध्येसुद्धा सकारात्मक वाढ नोंदविली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ ५.१० टक्के अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.

exports increased by more than 9 percent during  tenure of Modi government in last few years
Union Budget 2024: मोदी सरकारच्या नव्या अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्रावर असेल भर? सर्वसामान्यांना फायदा होणार का?

बिगर पेट्रोलियम व बिगर हिरे व दागिन्यांच्या निर्यातीमध्ये सुद्धा ८.८३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ही निर्यात २६२७ कोटी निर्यात झाली होती. यावर्षी या वस्तूंची निर्यात २८६० कोटी डॉलरची झाली आहे. त्याचप्रमाणे पेट्रोलियम पदार्थांच्या निर्यातीमध्ये १५.७५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्यावर्षी ही निर्यात ५८५ कोटी डॉलरची होती. यावर्षी ही निर्यात ६७८ कोटी डॉलरची झाली आहे. अभियांत्रिकी वस्तूंच्या निर्यातीमध्ये ७.३९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्यावर्षी ९०३ कोटी डॉलरची निर्यात यावर्षी एक हजार कोटी डॉलरवर पोहोचली आहे.

exports increased by more than 9 percent during  tenure of Modi government in last few years
NEET Re-exam : वाढीव गुणांवर फुली;‘नीट’ची २३ जूनला फेरपरीक्षा,३० पूर्वी निकाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com