Railway: प्रवाशांनो लक्ष द्या, या ३५ विशेष गाडयांना रेल्वेने दिली मुदतवाढ !

Western Railway: पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Railway: प्रवाशांनो लक्ष द्या, या ३५ विशेष गाडयांना रेल्वेने दिली मुदतवाढ !
Railwayesakal
Updated on

Indian Railway: रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने ३५ विशेष गाडयांची मुदतवाढ करण्यात आली आहे. यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ट्रेन क्रमांक ०९२०९ वांद्रे टर्मिनस-भावनगर टर्मिनस साप्ताहिक विशेष जी यापूर्वी २८ जून २०२४ पर्यंत अधिसूचित करण्यात आली होती, ती आता २६ जुलै २०२४ पर्यंत वाढवण्यात आली.

Railway: प्रवाशांनो लक्ष द्या, या ३५ विशेष गाडयांना रेल्वेने दिली मुदतवाढ !
Jalgaon Railway Police : रेल्वेखाली झोकून देत पोलिसाने वाचवले 2 वर्षीय चिमुरडीचे प्राण

ट्रेन क्रमांक ०९२०८ भावनगर टर्मिनस - वांद्रे टर्मिनस साप्ताहिक विशेष, ट्रेन क्रमांक ०९४१५ वांद्रे टर्मिनस - गांधीधाम साप्ताहिक विशेष, गाडी क्रमांक ०९४१६ गांधीधाम-वांद्रे टर्मिनस साप्ताहिक विशेष,ट्रेन क्रमांक ०९००७ वलसाड-भिवानी साप्ताहिक विशेष,आता २५ जुलै २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे.ट्रेन क्रमांक ०९००८ भिवानी-वलसाड साप्ताहिक विशेष, आता २६ जुलै २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे. ट्रेन क्रमांक ०९४९३ अहमदाबाद-पाटणा साप्ताहिक विशेष,आता २८ जुलै २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे. ट्रेन क्रमांक ०९४९४ पाटणा-अहमदाबाद साप्ताहिक विशेष, आता ३० जुलै २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

Railway: प्रवाशांनो लक्ष द्या, या ३५ विशेष गाडयांना रेल्वेने दिली मुदतवाढ !
Daund Railway : दौंड - रेल्वे प्रवाशांचे हाल आणि प्रशासनाची अरेरावी

सूरत-ब्रह्मपूर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस, साबरमती-हरिद्वार द्वि-साप्ताहिक विशेष एक्सप्रेस, हरिद्वार-साबरमती द्वि-साप्ताहिक विशेष एक्सप्रेस, गांधीग्राम-बोताड दैनिक (अनारक्षित) विशेष एक्सप्रेस, बोटाड-गांधीग्राम दैनिक (अनारक्षित) विशेष एक्सप्रेस, भुज-गांधीनगर कॅपिटल डेली स्पेशल एक्सप्रेस, गांधीनगर कॅपिटल - भुज डेली स्पेशल एक्सप्रेस, गांधीग्राम-भावनगर टर्मिनस डेली (अनारिक्षित) स्पेशल एक्सप्रेस, भावनगर टर्मिनस-गांधीग्राम दैनिक (अनारक्षित) विशेष एक्सप्रेस आणि धोला-भावनगर टर्मिनस दैनिक (अनारिक्षित) विशेष एक्सप्रेसला साधरणतः महिन्याभराची मुदतवाढ देण्यात आली आहे.

Railway: प्रवाशांनो लक्ष द्या, या ३५ विशेष गाडयांना रेल्वेने दिली मुदतवाढ !
Indian Railway: रेल्वेचा प्रवास होणार आणखी सुकर; मोदी सरकार करणार 50 हजार कोटी खर्च, काय आहे प्लॅन?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.