Crime News: "मला दोघांसोबतही रहायचंय..."; विवाहबाह्य संबंध उघड होताच महिला थेट विजेच्या खांबावर चढली, नेमकं काय घडलं?

Crime News: गोरखपूरमध्ये महिलेचे अनैतिक संबंध उघडकीस आल्यावर ती विजेच्या खांबावर चढली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस पथकाने मोठ्या प्रयत्नानंतर महिलेला विजेच्या खांबावरून खाली उतरवले.
Crime News
Crime Newsesakal
Updated on

Crime News: उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेचे अनैतिक संबंध उघड झाल्याने महिला थेट विजेच्या खांबावर चढली आहे. महिलेला तीन मुले असून तीचे गेल्या सात वर्षापासून प्रेमसंबंध होते. ही बाब पतीला समजताच त्याने विरोध केला. यानंतर महिला आत्महत्या करण्याची धमकी देऊ लागली.

महिलेने विजेच्या खांबावरील ताराला फाशी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न देखील केला आहे. यावेळी उपस्थित लोकांनी पोलिसांना संपर्क केला. तसेच वीजपुरवठा खंडित केला. ही घटना बुधवारी घडली.

या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. ज्यात ती महिला विजेच्या खांबावर आणि स्थानिक लोक तिला खाली उतरण्याची विनंती करताना दिसत आहेत. (UP Crime News)

इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार महिला तीन मुलांची आई असून तिचे एका तरुणासोबत कथित संबंध होते. त्यांचे विवाहबाह्य संबंध पती राम गोविंद (३५) याला समजल्यानंतर तिने आपल्या प्रियकराला आपल्या पतीप्रमाणेच राहू द्या, अशी मागणी केली. पती गोविंदने याला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे महिला घरातून निघून गेल्यावर विजेच्या खांबावर चढून ताराला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Crime News
RBI MPC Meet 2024: RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा मोठा निर्णय; तुमचा EMI कमी झाला का?

"विद्युत खांबावर चढलेल्या महिलेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले. प्रथमदर्शनी हे घरगुती वादाचे प्रकरण असल्याचे दिसते. आम्ही स्थानिक विद्युत विभागाच्या मदतीने महिलेला खाली उतरण्यास तयार केले. महिलेला वाचवण्यात आले आणि तिला तिच्या पतीसह घरी परत पाठवण्यात आले. आमच्याकडे अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही," अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Crime News
PM Narendra Modi Rally: शालेय गणवेशात मुलांनी PM मोदींच्या रॅलीला लावली हजेरी? हायकोर्टाचा पोलिसांना सवाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.