Congress : लक्षवेधी लढत : मुस्लिम मतांवर काँग्रेसची मदार

या मतदारसंघातील ४२ टक्के मतदार मुस्लिम आहेत
vote
votesakal
Updated on

नवी दिल्ली : मुस्लिमबहुल मतदारसंघ असूनही काँग्रेसला गेल्या ४० वर्षांपासून उत्तरप्रदेशातील सहारणपूर मतदारसंघात आपले अस्तित्व दाखविता आले नाही. परंतु यावर्षी समाजवादी पक्षाची साथ व बहुजन समाज पार्टीच्या घटत्या जनाधारामुळे काँग्रेसला यावर्षी या मतदारसंघातील विजयाचा दुष्काळ संपेल, असे वाटत आहे.

vote
Dhule Crime News : नकली मतदान कार्ड बनविणारे अटकेत; ‘एलसीबी’ची धडक कारवाई

या मतदारसंघातील ४२ टक्के मतदार मुस्लिम आहेत. कट्टरपंथीयांचा भाग असलेला देवबंद हा मतदारसंघ याच मतदारसंघात येतो. परंतु गेल्या अनेक निवडणुकांमध्ये या मतदाराने काँग्रेसला जवळ केलेले नाही. सप व बसप या दोन पक्षांचा आलटून पालटून या मतदारसंघावर वर्चस्व राहिले आहे. गेल्या निवडणुकीत सुद्धा बसपचे हाजी फजलूर रहमान केवळ २२ हजार मतांनी निवडून आले होते. गेल्या निवडणुकीत सप व बसपची लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी होती. यावेळी काँग्रेस व समाजवादी पक्षाने आघाडी केली आहे. याचा फायदा निश्चितपणे यावेळी काँग्रेसच्या उमेदवाराला मिळू शकणार आहे. काँग्रेसने पुन्हा इम्रान मसूद या वादग्रस्त नेत्यावर विश्वास दाखविला आहे. पश्चिम उत्तरप्रदेशात मसूद घराण्याचा काहीसा प्रभाव आहे. दलित मतेही दखलपात्र

मुस्लिमांच्या खालोखाल या मतदारसंघात दलित मतदारांचा टक्का सुद्धा चांगला आहे. या मतदारसंघात दलित मतदारांची संख्या २२ टक्के एवढी आहे. मुस्लिम व दलित मतदार मिळून ही संख्या ६० टक्क्यांवर आहे. या दोन मतदारांवर काँग्रेसचा डोळा आहे. उत्तरप्रदेशात बसपचा जनाधार कमी होत असल्याने हा मतदार पुन्हा काँग्रेसकडे वळल्यास इम्रान मसूद यांना यावेळी काँग्रेसचा झेंडा फडकविता येईल. भाजपने पुन्हा राघव लखनपाल यांच्यावर विश्वास दाखविला. दलित मतदार पुन्हा भाजपकडे सरकल्यास भाजपचे राघव लखनपाल सुद्धा इम्रान मसूद यांना टक्कर देणार हे स्पष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.