जम्मू-काश्मीरमधील माता वैष्णो देवी भवनात झालेल्या चेंगराचेंगरीत १२ यात्रेकरूंचा मृत्यू झाला. जखमींची जवळपास 20 जण जखमी असल्याचंही समोर आलंय. या दुर्घटनेचे प्रत्यक्षदर्शी सांगतात की, नवीन वर्षात माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने लोक आले होते, तिथून निघण्यासाठी मार्ग नव्हता.
घाईघाईत लोक इकडे तिकडे धावू लागले, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. काहींनी त्यांचा अनुभवही शेअर केला आहे. (Vaishno Devi Stampede) तर, दगड पडल्याची अफवा पसरली आणि लोक भीतीमुळे सैरभैर झाले, असं एकाने सांगितलं. तुर्तास पंतप्रधान मोदी यांनी दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांना प्रत्येकी 2 लाखांची मदत जाहीर केली आहे. तर सिन्हा यांनी मृतांना 10 लाखांची मदत दिली आहे.
मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर गेट क्रमांक तीनजवळ चेंगराचेंगरी झाली. जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंग यांनी माहिती दिली की, चेंगराचेंगरीची ही घटना शुक्रवारी-शनिवारी मध्यरात्री 2.45 च्या सुमारास घडली. (Vaishno Devi Temple) काही वादावादीनंतर लोकांनी एकमेकांना धक्काबुक्की सुरू केल्याने चेंगराचेंगरी झाल्याची प्राथमिक माहिती त्यांनी दिली. पण तिथे उपस्थित लोकांचे म्हणणे वेगळंच आहे. दगड पडल्याची अफवा पसरल्यानंतर ही चेंगराचेंगरी झाल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
'दृश्य खूपच भयावह होतं, मला पाहून भीती वाटली'
मध्य प्रदेशातील इंदौरच्या दीपालीनं सांगितलं की, ही घटना मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहे. ते अतिशय भीतीदायक दृश्य होते. हे बघून ती घाबरली. ताबडतोब तिच्या नवऱ्याला खाली जायला सांगितलं. पण तो पुढे सरकत राहिला. पुढे पाहिलं तर तिथे प्रचंड गर्दी होती. तेथे पोलीस प्रशासन तैनात नव्हते. ट्रॅव्हल स्लिप कोणीही तपासली नाही.
जीव वाचवण्यासाठी चढला खांबावर..
घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, माता वैष्णो देवी भवन मार्गावर मोठी गर्दी होती. ही गर्दी पाहून घबराट निर्माण झाली. गर्दी असताना लोकांना का थांबवलं नाही हा प्रशासनाचा दोष असल्याचं काही लोकांनी म्हटलं आहे. लोक चालत होते. त्यावेळी लुधियानाहून गेलेला एक भाविकही घटनास्थळी उपस्थित होता. दर्शनासाठी एवढ्या स्लिप का कापल्या, असं ते म्हणाले. आणखी स्लिप्स कापण्यात आल्याने चेंगराचेंगरी झाली आहे. एका खांबावर चढून आपला जीव वाचवल्याचे त्याने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.