फेसबुकने वाचवले दिल्लीतील तरुणाचे प्राण; लाइव्ह आत्महत्या करण्याचा होता प्रयत्न

फेसबुकने वाचवले दिल्लीतील तरुणाचे प्राण; लाइव्ह आत्महत्या करण्याचा होता प्रयत्न
Updated on

नवी दिल्ली : सोशल मीडियावर आत्महत्येचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या व्यक्तीचा सोशल मीडियाच्या सजगतेमुळे आणि दिल्ली पोलिसांच्या हालचालींमुळे जीव वाचल्याचा प्रकार नवी दिल्लीतील पालम येथे घडला. आत्महत्येचा प्रसंग गुरुवारी रात्री फेसबुकवरुन लाइव्ह होत असल्याचे पाहून फेसबुकच्या अमेरिकेतील कार्यालयातून दिल्लीच्या सायबर सेलला फोन गेला आणि दिल्लीतही हालचाल करत त्या व्यक्तीचा शोध घेतला. (Facebook saves life of Delhi youth; Attempted live suicide)

फेसबुकने वाचवले दिल्लीतील तरुणाचे प्राण; लाइव्ह आत्महत्या करण्याचा होता प्रयत्न
भारताच्या गुप्ता बंधूंची संपत्ती दक्षिण आफ्रिकानं केली सील

सोहन लाल (वय ३९, नाव बदलले) हा पश्‍चिम दिल्लीच्या द्वारका येथे राहतो. तो एका स्वीट होममध्ये काम करत होता आणि त्याला दोन मुले आहेत. त्याच्या पत्नीचे २०१६ मध्ये निधन झाल्याने नैराश्‍याने ग्रस्त होता. सध्या स्वीट होम बंद असल्याने बेरोजगार होता. शेजाऱ्यांशी भांडण झाल्याने संतापाच्या भरात त्याने आत्महत्या करण्याचे ठरवले. या घटनेचे त्याने फेसबुक लाइव्ह केले आणि हाताच्या शिरा कापल्या. हा प्रकार अमेरिकेतील फेसबुक कार्यालयाच्या दक्षता विभागाच्या लक्षात आला आणि त्यांनी गुरुवारी पहाटे १२.५० च्या सुमारास सायबर सेलचे अधिकारी अनिमेष रॉय यांना कॉल केला.

फेसबुकने वाचवले दिल्लीतील तरुणाचे प्राण; लाइव्ह आत्महत्या करण्याचा होता प्रयत्न
'नियम पाळा अन्यथा, परिणाम गंभीर'; केंद्राचा ट्विटरला अंतिम इशारा

दिल्लीतील रहिवासी असलेली एक व्यक्ती आत्महत्या करत असल्याचे सूचित करण्यात आले. यानुसार तातडीने हालचाली करत सायबर सेलचे निरीक्षक मनोज यांनी फेसबुक अकाउंटची तपासणी केली असता त्यास मोबाईल नंबर लिंक होता. परंतु तो नंबर स्वीच ऑफ सांगत होता. त्यानंतर त्याचा पत्ता शोधून काढला. तो पालमचा निघाला. याबाबतची माहिती पालम पोलिस ठाण्याला देण्यात आली. या घटनेची माहिती कळताच पोलिस त्या व्यक्तीच्या घरी पोचली असता सोहन लाल जमिनीवर बेशुद्धावस्थेत पडला होता. रक्त बरेच गेले होते. त्याला तातडीने खासगी दवाखान्यात नेण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याचे पाहून त्याला ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आले. त्याची तब्येत स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.