चहा पिल्याने कोरोनाचा संसर्ग होत नाही?

चहा
चहा
Updated on

देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे (Second Wave of Coronavirus). त्यामुळे प्रत्येकामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. त्यातच सोशल मीडियावर (Social Media) दररोज कोरोना महामारी रोखण्यासाठी अनेक उपाय सांगितले जात आहेत. काही लोकं यावर डोळं झाकून विश्वास ठेवतात. पण सोशल मीडियावर व्हायरल होणारी प्रत्येक बाब खरीच असेल असं नाही. त्यामुळे कोणत्याही बाबीवर विश्वास ठेवण्यापूर्वी सत्य पडताळून पाहावं. दिवसांतून तीन वेळा चहा पिल्यानं कोरोनाचा संसर्ग रोखता येतो, असा मेसेज गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर (social media) व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या मेसेज संदर्भात पीआयबीच्या फॅक्ट चेक(PIBFactCheck ) टीमनं तपासणी केली. हा व्हायरल होणारा मेसेज खोटा (False Information) असल्याचं पीआयबीच्या फॅक्ट चेक टीमला दिसून आलं. (fact check drinking tea will stop coronavirus Fact Check)

चहा पिल्याने कोरोना महामारी दूर होत असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची छाननी करत पीआयबी फॅक्ट चेकच्या टीमने (PIBFactCheck ) ट्विटद्वारे माहिती दिली आहे. पीआयबीनं सांगितले आहे की, चहा पिल्यानं कोरोनाचा संसर्ग होत नाही, हा दावा पूर्णतः खोटा आहे. याचे कोणतेही शास्त्रीय पुरावे नाहीत. चहा पिल्याने कोरोनाचा संसर्ग टाळता येतो ही माहिती खोटी असून, यामुळे लोकांची दिशाभूल (False Information) केली जात असल्याचे पीआयबीला आपल्या फॅक्ट चेकमध्ये दिसलेय.

पीआयबीचं ट्विट -

चहा
Fact Check : नाकात लिंबाचा रस टाकल्यास कोरोना जातो?
चहा
तुरटीच्या पाण्यामुळे कोरोना बरा होतो?

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर अनेक अफवा पसरत आहेत. यामध्ये अनेक अफवा या कोरोनावरील उपचारांशी निगडीत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोणत्याही माहितीची शहानिशा व सत्यता पडताळल्याशिवाय उपाय करु नका, असं वारंवार डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.