Fact Check: राहुल गांधींना दोषी ठरवणाऱ्या न्यायाधीशांची बढती सुप्रीम कोर्टानं खरंच रोखलीए? जाणून घ्या

ज्या न्यायाधीशांनी यासंदर्भातील आदेश काढला आहे, त्यांनीच याबाबत खुलासा केला आहे.
Rahul Gandhi
Rahul GandhiEsakal
Updated on

नवी दिल्ली : बदनामी प्रकरणात राहुल गांधींना दोषी ठरवणाऱ्या न्यायाधीशांची बढती सुप्रीम कोर्टानं रोखल्याच्या बातम्या नुकत्याचं देशभरातील मीडियानं दाखवल्या होत्या. पण खरंच असं काही घडलं आहे का? याचं फॅक्ट चेक 'बार अँड बेंच' या लीगल वेबसाईटनं केलं आहे. या फॅक्ट चेकनुसार, अशा प्रकारे संबंधित न्यायाधीशांची बढती रोखण्यात आलेली नाही. (Fact Check Supreme Court did not stay on promotion of judge who convicted Rahul Gandhi)

Rahul Gandhi
HuT Case: NIAची मोठी कारवाई! कट्टरतावाद्यांचं मोड्युल उद्ध्वस्त; डार्क वेबचा वापर, ओळख लपवून कारवाया

यासंदर्भात सुप्रीम कोर्टातील न्या. एम. आर. शाह यांनी एक आदेश दिला होता. आपल्या या आदेशाबाबत न्या. शाह यांनी बार अँड बेंचशी बोलताना सांगितलं की, त्यांनी दिलेला आदेश चुकीच्या पद्धतीनं माध्यमांनी प्रसारित केला. कारण जो आदेश मी दिला आहे त्यामध्ये राहुल गांधींना शिक्षा सुनावणारे न्यायाधीश येणार नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Rahul Gandhi
Team India : रोहित-विराटची T20 कारकीर्द संपली! वर्ल्ड कप 2024 मध्ये हा खेळाडू टीम इंडियाचा कर्णधार

न्या. शहा म्हणाले, मी दिलेल्या आदेशात एका विशिष्ट व्यक्तीबाबत भाष्य केलेलं नाही. त्यातला मुद्दा हा योग्यतेसह वरिष्ठता किंवा वरिष्ठतासह योग्यता असा होता. सोशल मीडियावर सुरु असलेल्या चर्चामध्ये म्हटलंय की, खंडपीठानं सर्व ६८ व्यक्तींच्या बढतीला स्थगिती दिली आहे. पण या लोकांना आदेश व्यवस्थित वाचलेले नाहीत.

Rahul Gandhi
Politics: महेश लांडगेंच्या मागणीवर चंद्रकांत पाटलांची मिश्किल टिप्पणी; म्हणाले, मुंबईचा समु्द्र...

केवळ योग्यता नसलेल्या न्यायाधीशांच्या (पण ज्यांना केवळ वरिष्ठतेच्या आधारे बढती देण्यात आली) बढत्या रोखण्यात आल्या आहेत. ज्या ६८ लोकांचा आदेशात उल्लेख आहे त्यामध्ये योग्यतेच्या निकषांमध्ये राहुल गांधींना शिक्षा सुनावणारे सूरत कोर्टाचे न्यायिन मॅजिस्ट्रेट हरीश हसमुखभाई वर्मा हे सर्वात पहिल्या क्रमांकवर आहेत. त्यामुळं त्यांना बढती तर मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.