खोट्या बातम्या शोधण्यासाठी आता पोलिस ठाण्यांत असणार 'फॅक्ट चेक' युनिट; मुख्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

CM Siddaramaiah : लोकशाहीचे तीन हात समतोल राखून काम करत असताना, पत्रकारांनीही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
CM Siddaramaiah
CM Siddaramaiahesakal
Updated on
Summary

खोट्या बातम्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व पोलिस ठाण्यांमध्ये तथ्य तपासणी युनिट स्थापन करण्यात आली आहेत.

बंगळूर : खोट्या बातम्यांना आळा घातला नाही तर लोकशाही, संविधान आणि सामाजिक मूल्ये टिकून राहणे कठीण होईल. त्यामुळे अशा बातम्या शोधण्यासाठी पोलिस ठाण्यांमध्ये (Police Station) ‘फॅक्ट चेक’ युनिटस्‌ स्थापन करण्यात आली आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी दिली आहे.

म्हैसूरच्या राणी बहादूर हॉलमध्ये म्हैसूर जिल्हा पत्रकार संघाने आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, ‘फेक न्यूज’ हे धार्मिक आणि सामाजिक संघर्ष वाढण्याचे कारण आहे. त्यांचा प्रसार करणे हे कोणालाच गौरव मिळवून देणारे काम नाही. तसेच भाषण स्वातंत्र्य हे लोकशाहीचा प्राण आहे.

CM Siddaramaiah
पुण्याच्या प्रसिद्ध उद्योगपतीचा निर्घृण खून; चाकू, लोखंडी रॉडसह तलवारीने हल्ला, पाच ते सहा मारेकऱ्यांच्या हल्ल्यात पत्नीही जखमी

लोकशाहीचे तीन हात समतोल राखून काम करत असताना, पत्रकारांनीही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. मात्र, प्रसारमाध्यमांवर कोणतेही बंधन नसावे. खोट्या बातम्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व पोलिस ठाण्यांमध्ये तथ्य तपासणी युनिट स्थापन करण्यात आली आहेत; पण सर्वच बातम्या कायद्याने नियंत्रित करता येत नाहीत. व्यक्ती आणि समाजाच्या उत्कर्षात कोणीही हस्तक्षेप करू नये.

CM Siddaramaiah
Sharad Pawar : 'दोन महिन्यांनंतर राज्यातील परिस्थिती बदलेल'; शरद पवारांचं सूचक वक्तव्य

पत्रकारांनीही आपली जबाबदारी नेहमी लक्षात ठेवावी आणि खोट्या बातम्यांपासून दूर राहावे. अशी बातमी खूप वेगाने पसरते, त्यांना आळा न घातल्यास लोकशाही, घटनात्मक मूल्ये आणि सामाजिक मूल्यांना धोका निर्माण होईल. धार्मिक आणि सामाजिक प्रश्नांवर संघर्षाला कारणीभूत ठरणाऱ्या अशा बातम्या समाजाचे भले करत नाहीत, त्यामुळे ते थांबले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.