Fact Check: कोल्हापुरात ट्रकमधून आणलेल्या 'त्या' ६३ मुलांबाबतच सत्य काय?; वाचा फॅक्ट चेक

ही मुलं बांगलादेशातील रोहिंग्या असल्याचा दावा काही जणांनी सोशल मीडियातून केला होता.
Kolhapur
Kolhapur
Updated on

नवी दिल्ली : बिहारमधून मोठ्या ट्रकमधून ६३ मुस्लिम मुलं कोल्हापूरात आणताना पोलिसांनी हा ट्रक फिल्मी स्टाईलनं अडवला होता. या घटनेनंतर सोशल मीडियातून याचे व्हिडिओ व्हायरलं झाले होते. तसेच ही मुलं बांगलादेशातील रोहिंग्या समाजाची असून त्यांना अशा बेकायदा पद्धतीनं भारतातील विविध भागात आणलं जात असल्याचा दावा करण्यात आला होता. पण हा दावा खोटा असल्याचं एका फॅक्टचेकमधून समोर आलं आहे. काय आहे हे फॅक्ट चेक पाहुयात. (Fact Check What is truth about those 63 children who came from a truck in Kolhapur)

'ऑल्ट न्यूज' या फॅक्ट चेकर वेबसाईटनं या घटनेचं फॅक्ट चेक केलं आहे. त्यांनी म्हटलं की, शिवम दीक्षित नामक एका व्यक्तीनं आपल्या ट्विटरवरुन व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्यक्तीच्या ट्विटर बायोनुसार तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या पांचजन्यचा उपसंपादक आहे. या व्यक्तीनं १९ मार्च रोजी हा व्हिडिओ आपल्या ट्विटरवरुन शेअर करत दावा केला होता की, "कोल्हापुरात ६३ मुस्लिम मुलांना घेऊन येणारा ट्रक पोलिसांनी रुईकर कॉलनी इथं दुपारी २ वाजता अडवला. ही सर्व मुलं आपण बिहारमधून आल्याचं सांगत होती. पण त्यांच्याकडील रेल्वे तिकीटं पश्चिम बंगालची दिसत आहेत. आता तुम्हाला सांगतो की, बांगलादेशातील रोहिंग्यांना पश्चिम बंगालमध्ये प्रवेश दिला जातो. तिथून नंतर या मुलांना देशभरात पाठवलं जातं. शेवटी यांचा प्लॅन काय आहे?" शिवम दीक्षित यांच्या या ट्विटला १,२२,००० व्ह्यूव्ज असून २००० वेळा ते रिट्विट करण्यात आलं आहे.

फॅक्ट चेकमध्ये काय दिसून आलं?

ऑल्ट न्यूजनं या व्हायरल व्हिडिओचं फॅक्ट चेक केलं. त्यासाठी त्यांनी इंडिया टीव्हीचा हवाला देताना सांगितलं की, या न्यूज चॅनेलनं आपल्या न्यूज रिपोर्टमध्ये या मुलांना कोल्हापुरात आणण्यात आल्याचं म्हटलं आहे पण ही मुलं मदरशांमध्ये शिक्षणासाठी आणल्याचं म्हटलं आहे. या रिपोर्टमध्ये असंही म्हटलं की, १७ मे रोजी ही घटना घडली असून पोलिसांनी हा ट्रक थांबवला कारण काही हिंदुत्ववादी संघटनांनी याबाबत संशय व्यक्त केला होता. पण पोलिसांनी या मुलांची ओळख पटवण्यासाठी त्यांचे आधार कार्ड तपासले तसेच ज्या मदरशामध्ये त्यांना नेण्यात येणार होतं तिथल्या मौलानाशी देखील पोलिसांनी संपर्क साधला आणि त्याच्याकडूनही या मुलांची ओळख निश्चित करुन घेतली. यामध्ये त्यांची नाव आणि कुटुंबाच्या माहितीचा समावेश होता.

त्याचबरोबर IANS TVनं देखील आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं की, "हा प्रकार मुलांच्या तस्करीचा प्रकार आहे का? असा पोलिसांना संशय होता. पण नंतर हे स्पष्ट झालं की ही मुलं कोल्हापुरात मदरशामध्ये शिक्षणासाठी आली होती.

Kolhapur
Sharad Pawar: 2000च्या नोटबंदीवर शरद पवारांची खोचक प्रतिक्रिया; म्हणाले, लहरी माणसानं...

इतकंच नव्हे तर ऑल्ट न्यूजनं कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधला आणि या मुलांचा तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, "ही मुलं कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा इथल्या मदरशात शिक्षणासाठी आली होती. ही मुलं बिहारमधून शिक्षणासाठी कोल्हापूरात आली होती पण त्यांना ट्रकमधून आणल्यानं या प्रकाराकडं संशयानं पाहिलं गेलं आणि त्याची जास्त चर्चा झाली"

Kolhapur
Manipur Violence: मणिपूरात पुन्हा उफाळला हिंसाचार! इंफाळमध्ये जमावाचा धुडगूस, अनेक घरं पेटवली

तसेच ज्या पोलीस कर्मचाऱ्याचा थेटपणे हे प्रकरण हाताळलं त्या कर्मचाऱ्यानंही हेच सांगितलं की, "मुलांना घेऊन येणारा ट्रक पकडल्यानंतर या मुलांना कोल्हापुरातील बाल कल्याण समितीकडं सोपवण्यात आलं. यातील मुलं ही बिहारमधील अरारिया आणि सुपौल या दोन जिल्ह्यांमधून आलेली होती. या मुलांनी पश्चिम बंगालमधील हावडा इथून पुणे इथं येण्यासाठी ट्रेन पकडली होती. त्यानंतर पुण्यातून त्यांना ट्रकमधून कोल्हापुरात आणण्यात आलं"

Kolhapur
Tushar Bhosale: त्र्यंबकेश्वर वादावर तुषार भोसलेंनी उकरुन काढला नवा वाद; आरोपीबाबत केला मोठा दावा

ऑल्टन्यूजनं कोल्हापूरच्या बाल कल्याण समितीच्या सदस्यांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी सांगितलं की, "ही मुलं सध्या आमच्या ताब्यात असून त्यांना पुन्हा त्यांच्या बिहारमधील घरी पाठवण्यात येणार आहे. यासाठी आम्ही बिहारमधील बाल कल्याण समितीच्या संपर्कात आहोत. त्यांची ओळखही पटली आहे. या ट्रकमध्ये एकूण ६९ मुलं होती"

दावा खोटा असल्याचं सिद्ध

या फॅक्ट चेकनंतर ही मुलं बांगलादेशातील रोहिंग्या नसून ते बेकायदा पद्धतीनं भारतात दाखल झाल्याचंही खोटं आहे. व्हायरलं व्हिडिओतील सर्व मुलं ही बिहारमधील असून ती शिक्षणासाठी पश्चिम बंगालमार्गे कोल्हापूरात दाखल झाली होती, हे सत्य असल्याचं स्पष्ट झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.