सुरतच्या अमरोली परिसरात तिहेरी हत्याकांडाची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नोकरीवरून काढून टाकल्यामुळे संतप्त झालेल्या दोन कर्मचाऱ्यांनी कारखान्याचा मालक, त्याचे वडील आणि मामाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या हत्येतील अल्पवयीन व अन्य एका आरोपीला अटक केली आहे.
आरोपी अंजनी इंडस्ट्रियल एरियातील वेदांत टॅक्सो नावाच्या एम्ब्रॉयडरी फॅक्टरीत काम करायचे. काही दिवसांपूर्वी दोन्ही कर्मचाऱ्यांना कारखाना मालकाने कामावरून काढून टाकले होते. रविवारी कामावरुन काढलेले कामगार आणि कारखान्याच्या मालकामध्ये वाद झाला. यानंतर दोन्ही आरोपींनी कारखान्याचे मालक कल्पेश ढोलकिया यांच्यावर हल्ला केला. बचावासाठी आलेले कल्पेशचे वडील धनजीभाई आणि मामा घनश्यामभाई यांच्यावरही हल्ला करून तिघांचीही हत्या करण्यात आली.
हेही वाचा - Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?
सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली
डीसीपी हर्षद मेहता यांनी सांगितले की, ही घटना सकाळी 9.30 च्या सुमारास अमरोली येथील वेदांत टॅक्समध्ये घडली. काही दिवसांपूर्वी कारागीरांनी कपड्याच्या कारखान्यात काम करणे सुरू केले होते. रात्रीच्या शिफ्टमध्ये काम न केल्याने दोन्ही आरोपींना नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे दोन्ही आरोपींनी कारखाना मालकासह तिघांची हत्या केली आहे.
खुनाच्या घटनेनंतर उच्चस्तरीय बैठक
सुरतच्या अमरोली येथील एम्ब्रॉयडरी कारखान्याच्या व्यापाऱ्यांच्या हत्येप्रकरणी उच्चस्तरीय बैठक घेण्यात येणार आहे. सुरत पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीला गृह राज्यमंत्री हर्ष संघवीही उपस्थित होते. या संदर्भात स्थानिक आमदार, समाजाचे नेते, उद्योजक यांची विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत अशा घटनांवर कठोर उपाययोजना करण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.