अहमदाबाद - हुबेहुब न्यायालयासारखे वातावरण, आदेश पारित करणारे न्यायाधीश. फरक एवढाच की हे खरेखुरे न्यायालय नव्हते तर न्यायालयापासून न्यायाधीशापर्यंत सर्व काही बनावट. छत्तीसगडमध्ये ‘एसबीआय’च्या बनावट शाखेचा भांडाफोड झाल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वीच उघड झाला होता. आता, गुजरातेत बनावट न्यायालयाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. सर्वसामान्यांसह प्रशासन, पोलिसांच्या डोळ्यात धूळ टाकत हे न्यायालय पाच वर्षे सुरू होते, हे विशेष.