बोगस लसीकरण करणाऱ्यांना जन्मठेप द्या, अशोक गेहलोतांची मागणी

मुंबईतील घटनेवर केलं टि्वट
बोगस लसीकरण करणाऱ्यांना जन्मठेप द्या, अशोक गेहलोतांची मागणी
Updated on

जयपूर: कोरोना प्रतिबंधक लसींच्या (vaccination) नावाखाली खोट्या लसी देणाऱ्या तसेच अशा लसींचे उत्पादन करणाऱ्यांना अद्दल घडवण्यासाठी केंद्राने जन्मठेपेच्या (life sentence) शिक्षेची तरतूद करावी, अशी मागणी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली आहे. मुंबईत (mumbai) कांदिवली भागात (kandivali area) रहिवाशाची लसीकरणामध्ये फसवणूक झालीय. खासगी रुग्णालयाच्या नावाखाली लसीकरण शिबीर आयोजित करुन रहिवाशांची फसवणूक करण्यात आली. (Fake vaccination racket Gehlot demands life sentence for such criminals)

या प्रकरणात पाच जणांना अटक झालीय. त्या पार्श्वभूमीवर अशोक गेहलोत यांनी ही मागणी केली आहे. बोगस लसीकरणाचा असाच प्रकार बोरिवलीत सुद्धा घडल्याची शक्यता आहे. या प्रकरणी कॉलेजने पोलिसात तक्रार नोंदवली आहे. कारण कॉलेजमध्ये लसीकरण झालेल्या नागरिकांना अजून प्रमाणपत्र मिळालेले नाही.

बोगस लसीकरण करणाऱ्यांना जन्मठेप द्या, अशोक गेहलोतांची मागणी
मुंबईत लसीला प्रचंड डिमांड, २० लाख डोसची मागणी

"मुंबईत बनावट लसीकरण झाल्याच्या बातम्या येत आहेत, हे चिंताजनक आहे. त्याआधी बहुतांश ठिकाणी बनावट रेमडेसिव्हीर इंजेक्शन दिल्याचे प्रकार घडले आहेत. अशा टोळया लोकांच्या जीवाशी खेळत आहेत. केंद्र सरकारने तात्काळ अध्यादेश आणून अशा गुन्हेगारांसाठी जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद केली पाहिजे" असे टि्वट अशोक गेहलोत यांनी केले आहे.

बोगस लसीकरण करणाऱ्यांना जन्मठेप द्या, अशोक गेहलोतांची मागणी
शिवसेनेला शिंग कुठे आहेत? - नारायण राणे

खासगी रुग्णालये सरकारकडूनच लस विकत घेतील, हे केंद्राने सुनिश्चित केले पाहिजे, असे गेहलोत यांनी म्हटले आहे. मुंबईतील या बोगस लसीकरणाच्या प्रकाराने देशात खळबळ उडवून दिली आहे. मुंबईत आता खासगी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये रुग्णालयांमार्फत लसीकरण शिबीर आयोजित केली जात आहेत. त्यात काही ठिकाणी फसवणुकीचे प्रकार घडलेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()