Ayodhya Ram Mandir Donation : सध्या केवळ भारतातच नाही, तर जगभरात अयोध्येतील राम मंदिराची चर्चा सुरू आहे. 22 जानेवारी रोजी या मंदिराची प्राणप्रतिष्ठा पार पडणार आहे. या भव्य मंदिराच्या उभारणीत आपलाही खारीचा वाटा असावा असं जगभरातील कित्येक रामभक्तांना वाटत आहे. यासाठी कित्येक जण ऑनलाईन देणगी देण्याचा मार्ग निवडत आहेत. मात्र, याचाच फायदा काही स्कॅमर्स घेत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
राम मंदिरासाठी देणगी गोळा करणाऱ्या कित्येक फेक वेबसाईट्स सुरू करण्यात आल्या आहेत. म्हणजेच, जर एखादी व्यक्ती भक्तीभावाने राम मंदिरासाठी देणगी देत असेल, तर या फेक वेबसाईटच्या माध्यमातून हे पैसे थेट स्कॅमर्सच्या अकाउंटमध्ये पोहोचत आहेत. त्यामुळेच, राम मंदिरासाठी देणगी देताना खबरदारी घेण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
राम मंदिराच्या उभारणीसाठी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची निर्मिती करण्यात आली आहे. जगभरातील श्रीरामभक्त या ट्रस्टमध्ये आपले पैसे देणगी म्हणून देऊ शकतात. कॅश किंवा ऑनलाईन माध्यमातून हे पैसे देता येतील. (Where can donations be made?)
ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी राम मंदिरासाठी तयार करण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
राम मंदिर ट्रस्टच्या वेबसाईटवर काही बँक खात्यांची माहिती देखील देण्यात आली आहे. तुम्ही थेट या बँक अकाउंटमध्ये पैसे भरून राम मंदिरासाठी देणगी देऊ शकता. (You can donate to Ram Mandir by paying money directly into this bank account)
याठिकाणी भारतीय पासपोर्ट नसणाऱ्या व्यक्तींसाठी देखील वेगळ्या अकाउंटची माहिती देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.