नवी दिल्ली : अमरनाथ यात्रा सुरू असल्याने काश्मीर खोऱ्यात लष्कर आणि निमलष्करी दलाचे जवान सजग झालेले असताना लष्करे तय्यबाशी संलग्न असलेल्या द रेसिस्टंन्स फ्रंट (टीआरएफ)चे ‘फाल्कन स्क्वॉड’ हे सुरक्षा दलासाठी आव्हान ठरत आहे. हे दहशतवादी लहान पिस्तुलाच्या मदतीने हल्ला करतात. या स्क्वॉडची सक्रियता अलीकडच्या काळातील घातपाती कारवायांतून उघड झाली. बारामुल्ला शहरात गेल्यावर्षी झालेल्या ग्रेनेड हल्ला हा फाल्कन स्क्वॉडने घडवून आणला होता.
या कारवाया जम्मू आणि काश्मीर पोलिस तसेच अन्य तपास यंत्रणांच्या रडारवर आल्या आहेत. बारामुल्ला आणि परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटना, स्फोटकांची वाहतूक करणे यात या गटाचा सक्रिय सहभाग दिसून आला. मे महिन्यात झालेल्या हल्ल्यात एक कर्मचारी ठार तर तीन जण जखमी झाले. या हल्ल्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी चार दहशतवाद्यांना अटक केली तसेच फाल्कन स्क्वॉडमधील त्यांच्या एका साथीदाराला पकडण्यात यश आले.
फाल्कन स्क्वॉड म्हणजे काय
सुरक्षा यंत्रणाने दिलेल्या माहितीनुसार, फाल्कन स्क्वॉडमध्ये सहभागी असलेले तरुण लहान शस्त्रांचा, पिस्तुलाचा वापर करतात. ते हल्ला करतात आणि दिवस बेपत्ता असतात. कालांतराने सामान्यपणे जीवन जगू लागतात. हल्लेखोरांचे कोणतेही रिकॉर्ड पोलिसांकडे नसल्याने त्यांचा शोध लावणे कठीण जाते. नव्या प्रकाराला फाल्कन स्क्वॉड किंवा गझेल स्क्वॉड असेही म्हटले जाते. या गटात काम करणारे दहशतवादी १५ ते १८ वयोगटातील असून त्यांची ऑनलाइनच्या माध्यमातून भरती करण्यात आल्याचे सुरक्षा दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.