नवी दिल्ली : इंद्रप्रस्थ मेडिकल कॉर्पोरेशन लिमिटेडनं (आयएमसीएल) अर्थात अपोलो हॉस्पिटल ग्रुपनं मंगळवारी म्यानमारमधील गरीब लोकांकडून किडनी खरेदी करण्याच्या 'कॅश फॉर किडनी' रॅकेटमध्ये सहभाग असल्याच्या कथित आरोपांना उत्तर दिलं आहे. हे सर्व पूर्णपणे खोटं असल्याचं सांगत आरोपांचं त्यांनी खंडन केलं. युकेमधील 'द टेलिग्राफ' दैनिकात अलिकडेच यासंदर्भात वृत्त छापून आलं होतं. (False ill informed misleading Apollo Hospital group refutes allegations of cash for kidney scam)
IMCL हे अपोलो हॉस्पिटल्सचा एक भाग आहे, जे देशातील सर्वात मोठ्या हॉस्पिटल समूहांपैकी एक आहे. 3 डिसेंबरच्या वृत्तानुसार, लंडनस्थित 'द टेलिग्राफ' वृत्तपत्राने असा आरोप केला आहे की, "म्यानमारमधील हताश गरीब तरुण गावकऱ्यांना पैशांचं आमिष दाखवून त्यांचे अवयव विकण्यास भाग पाडलं आहे. या वृत्तानुसार, दिल्लीतील रुग्णालयात हे उपचार केले जात असून श्रीमंत बर्मी रुग्णांकडू मूत्रपिंड दान केल्याबद्दल दात्यांना पैसे दिले जात आहेत"
दरम्यान, टेलिग्राफच्या दाव्यांना प्रत्युत्तर देताना, IMCLच्या प्रवक्त्यानं सांगितले की, "आमच्यावर आंतरराष्ट्रीय मीडियानं केलेले आरोप पूर्णपणे खोटे, चुकीचे आणि माहितीचा अभाव असलेले दिशाभूल करणारे आहेत. याबाबतची सर्व तथ्ये आम्ही संबंधित पत्रकाराला तपशीलवार शेअर केले होते"
"स्पष्टपणे सांगायचे तर, IMCL प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेसाठी प्रत्येक कायदेशीर आणि नैतिक गोष्टींचे पालन करते, ज्यात सरकारनं घालून दिलेली सर्व मार्गदर्शक तत्त्वे आणि आमच्या विस्तृत अंतर्गत प्रक्रियांचा समावेश आहे," असं प्रवक्त्यानं सांगितले. IMCLला प्रत्येक देणगीदाराला त्यांच्या देशातील संबंधित मंत्रालयानं नोटरी केलेला 'फॉर्म 21' प्रदान करणं आवश्यक आहे, असंही त्यांनी सांगितलं.
IMCL मधील सरकारनं नियुक्त केलेली प्रत्यारोपण प्राधिकरण समिती या प्रमाणपत्रासह प्रत्येक प्रकरणासाठी दस्तऐवजांचे पुनरावलोकन करते आणि दाता तसेच प्राप्तकर्त्याची मुलाखत घेते. ही मुलाखत पुढे पुन्हा प्रमाणित केली जाते. देशाच्या संबंधित दूतावासाकडं कागदपत्रं, रुग्ण आणि दात्यांच्या अनुवांशिक चाचणीसह अनेक वैद्यकीय चाचण्या केल्या जातात," असंही प्रवक्त्यांनी सांगितलं.
भारताच्या मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यांतर्गत, पती-पत्नी, भावंड, आई-वडील आणि नातवंडे यांसारखे जवळचे नातेवाईकच अवयवदान करू शकतात. कायद्यानं परवानगी दिलेली मानवतावादी कारणं वगळता, अनोळखी व्यक्तींकडून देणगी देण्यास प्रतिबंध आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.