‘साहेबऽऽ मला पत्नीपासून वाचवा, ती मारते’; पतीची पोलिसांना विनवणी

Uttar Preadesh Crime news
Uttar Preadesh Crime newsUttar Preadesh Crime news
Updated on

महाराजगंज : पती आणि सासरच्या छळाला कंटाळून (Family Dispute) महिलांनी पोलिस स्टेशन गाठून तक्रार केल्याचे अनेकवेळा ऐकले आहे. परंतु, उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) महाराजगंजमधून समोर आलेल्या एका प्रकरणाने केवळ पोलिसांचेच नाही तर पोलिस ठाण्यात उपस्थित असलेल्या लोकांचेही होश उडवले आहेत. पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने सिंधुरिया पोलिस ठाणे गाठले. पोलिस ठाण्यात उपस्थित प्रभारी निरीक्षकांकडे जाताच पत्नीपासून वाचवण्याची विनवणी सुरू केली.

हे प्रकरण सिंदुरिया पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावातील आहे. जनसुनावणीदरम्यान पती प्रभारी निरीक्षकांसमोर हजर झाला. अर्ज देऊन त्याने पत्नी मारहाण करीत असल्याचे सांगितले. ती सतत शिवीगाळ करते. वयोवृद्ध आईला त्रास देते. ती धमकी देते. ती ऐकत नाही आणि मुलांची काळजीही घेत नाही. दिवसभर फोनवर बोलत राहते. पतीच्या या तक्रारीवरून सिंदुरिया पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत पत्नीशी बोलणे केले.

Uttar Preadesh Crime news
उद्धव ठाकरे शिवसेना-भाजप युतीचे पुनरुज्जीवन करण्यास उत्सुक होते - शेवाळे

या दोघांचे २० वर्षांपूर्वी लग्न झाले. दोघांना मोठी मुलगी आणि मुलगा आहे. २०१८ मध्ये रोजगार सेवक पदावर महिलेची निवड झाली आहे. प्राथमिक तपासानंतर पोलिसांच्या चौकशीत पत्नीने सांगितले की, नवरा वडिलोपार्जित मालमत्ता (property) दलालांच्या सांगण्यावरून विकत आहे. जमीन विकण्यास नकार दिल्याने वाद सुरू आहे. पतीने केलेला आरोप खोटा आहे.

पोलिस स्टेशनमध्ये झालेल्या जनसुनावणीदरम्यान पती पत्नीविरुद्ध तक्रार घेऊन आला होता. जमीन विक्रीचा वाद आहे. दोघांचाही खुलासा झाला. कौटुंबिक समुपदेशन केंद्रामार्फत दोघांचे समुपदेशन केले जाईल. समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे सिंदुरियाचे प्रभारी निरीक्षक रामकृष्ण यादव यांनी सांगितले.

Uttar Preadesh Crime news
केजरीवालांना धक्का! सिंगापूरला जाऊ शकणार नाही; एलजीने नाकारली परवानगी

नात्यातील कटुता पाहून पोलिसांचीही कोंडी

‘सर मला माझ्या पत्नीपासून वाचवा. ती मला मारत राहते’ अशी विनवणी पती करू लागला. पती-पत्नीच्या नात्यातील कटुता पाहून पोलिसांचीही कोंडी झाली. पत्नीने मारहाणीचा आरोप निराधार असल्याचे सांगितले. शेतमालाच्या विक्रीला विरोध करीत ते बिनबुडाचे आरोप करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.