Chirag Paswan : कौटुंबिक कलहाचे चिराग पासवान यांच्यापुढे आव्हान

मागील दोन लोकसभा निवडणुकीत म्हणजेच २०१४ आणि २०१९ मध्ये चिराग पासवान यांनी जमुईमधून विजय मिळवला होता
chirag-paswan
chirag-paswan sakal
Updated on

हाजीपूर (बिहार) ः दिवंगत दलित नेते नेते रामविलास पासवान यांनी हाजीपूरमधून आठ वेळा विजय मिळवला होता. हाजीपूरमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गवरील रामविलास चौकातला त्यांचा पुतळा ‘हाजीपूर व रामविलास पासवान’ या तब्बल चार दशकांच्या नात्याची साक्ष देणारा आहे. त्याच राजकीय वारशाच्या जोरावर चिराग पासवान यांनी हाजीपूरमधील उमेदवारीच्या घोषणेतून लोकजनशक्ती पक्षावरील आपला दावा मजबूत केला आहे. परंतु, काका पशुपतिनाथ पारस यांच्याशी झालेला कौटुंबिक कलह आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी टोकाचे मतभेद या आव्हानांनी चिराग पासवान यांच्या विजयाचा मार्ग काटेरी केला आहे.

chirag-paswan
Nashik News : मालेगावी स्वाईन फ्लूने एकाचा मृत्यू; मनपा आरोग्य विभाग अलर्ट

मागील दोन लोकसभा निवडणुकीत म्हणजेच २०१४ आणि २०१९ मध्ये चिराग पासवान यांनी जमुईमधून विजय मिळवला होता. मात्र यावेळी त्यांनी हाजीपूरमधून निवडणूक लढण्याची घोषणा केली. रामविलास पासवान यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या चिराग पासवान यांच्या कर्तृत्वाची कसोटी केवळ हाजीपूरमध्येच नव्हे तर लोकजनशक्ती (रामविलास) या पक्षाला मिळालेल्या जमुई, वैशाली, खगडिया आणि समस्तीपूर या चार जागांवरही आहे. यातील जमुईमध्ये मेव्हणे अरुण भारती यांना दिलेल्या उमेदवारीमुळे चिराग पासवान यांना नव्या घराणेशाहीची टीकाही सहन करावी लागली आहे.

chirag-paswan
Mumbai Local News: हार्बर मार्गावर भिकाऱ्यांचा वाढता उच्छाद; नवी मुंबईकर त्रस्त

पासवान बहुल हाजीपूर मतदार संघात दलित मतदारांची संख्या निर्णायक आहेच, सोबत भूमिहार, राजपूत या उच्च जातींसह कुशवाहा आणि अन्य ओबीसी जाती देखील लक्षणीय आहेत. रामविलास पासवान यांच्या नावाच्या जोरावर त्याआधारे चिराग पासवान आपले राजकीय गणित जुळविण्याच्या प्रयत्नात आहेत. हाजीपूरपासून काही अंतरावरच्या पोखरेरा गावातील सरकारी शाळेतील शिक्षक नाव न छापण्याच्या अटीवर सांगतात, की रामविलास पासवान यांच्यामुळे ब्राह्मण, भूमिहार, राजपूत ही उच्चवर्णीय मते, ओबीसी समुदायातील लोहार, कानू तेली, अतिमागास समुदायातील कहार यासारख्या जाती आणि पासवान समुदाय यांची सहानुभूती चिराग पासवान यांच्याबाजूने राहील. परंतु, लालगंज भागातील रवींद्रकुमार यादव यांचा हाजीपूर मतदार संघ वर्षानुवर्षे राखीव का? बाकीच्या ठिकाणी मतदार संघांची पुनर्रचना झाली ती इथे का होत नाही? हा प्रातिनिधिक सवाल हाजीपूरच्या जातीय समीकरणांमध्ये चिराग पासवान यांच्यासाठी त्रासदायक ठरणारा देखील आहे.

chirag-paswan
Pune News : पानशेत नदीपात्रात गोधड्या धुण्यासाठी गेलेल्या पुण्यातील मजूर तरुणाचा बुडून मृत्यू

लोकजनशक्ती पक्षावरील वर्चस्वासाठी पासवान कुटुंबात पेटलेल्या लढाईमध्ये भाजपने बिहारमधील जातीय समीकरणे लक्षात घेऊन अंतिमतः चिराग पासवान यांच्या पाठीशी बळ उभे केल्यानंतर नाराज पशुपतिनाथ पारस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातून तडकाफडकी राजीनामा दिला होता. वेगळ्या राजकीय पर्यायांची चाचपणीही त्यांनी चालविली होती. मात्र भाजपने योग्य पद्धतीने समजावल्यानंतर त्यांनी नमते घेतले असले तरी चिराग पासवान यांच्याबद्दलचा त्यांचा सल कमी झालेला नाही. पासवान कुटुंबीयांकडूनच चिराग पासवान यांच्या मातोश्रींचा रिना ‘शर्मा’ पासवान असा होणारा सूचक उल्लेख मतभेद किती गहिरे झाले आहेत हे दर्शविणारा आहे.

चिराग यांच्याकडून शक्तीप्रदर्शन

हाजीपूरमध्ये पाचव्या टप्प्यात (२० मे) मतदान होणार आहे. त्याआधी उमेदवारी दाखल करताना भाजपचे केंद्रीय नेते, एनडीएतील मित्रपक्षांचे नेते यांना एकत्र आणून आपले शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न चिराग पासवान यांचा आहे. हाजीपूरमध्ये त्यांचा मुकाबला राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार शिवचंद्र राम यांच्याशी होणार आहे. २०१९ मध्ये शिवचंद्र राम यांचा पशुपतिनाथ पारस यांनी पराभव केला होता. आता शिवचंद्र राम यांना पुन्हा उमेदवारी देऊन राष्ट्रीय जनता दलाने ‘सहज भेटणारा, साधा खासदार हवा की व्हीआयपी आणि लोकांपासून दुरावलेला खासदार हवा?’ असा प्रचार सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.