गुजरातमधील 2002 च्या गोध्रा हत्याकांडात प्राण गमावलेल्या 59 लोकांपैकी 19 कारसेवकांचे कुटुंब अयोध्येतील प्रभू राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. विहिंपच्या एका पदाधिकाऱ्याने शनिवारी याबाबत माहिती दिली. गुजरातमधील इतर निमंत्रितांमध्ये 320 संत आणि 105 मान्यवरांचा समावेश आहे.
विश्व हिंदू परिषदेचे गुजरातचे सरचिटणीस अशोक रावल म्हणाले, 'राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आलेल्यांमध्ये गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ साबरमती एक्स्प्रेस ट्रेनच्या दोन डब्यांना आग लागल्याने मृत्युमुखी पडलेल्या कारसेवकांच्या कुटुंबांचाही समावेश आहे. मृत कारसेवक अयोध्येहून अहमदाबादला परतत होते.
ते म्हणाले की, ज्यांचे संपर्क तपशील उपलब्ध आहेत अशा ३९ पैकी २० कारसेवकांच्या कुटुंबीयांशी विहिंप संपर्क करू शकले. त्यातील 19 जणांनी 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या समारंभाला उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी विहिंपने 225 कोटी रुपये जमा करून योगदान दिल्याचा दावा रावल यांनी केला आहे.
फेब्रुवारी 2002 मध्ये ट्रेन जाळण्याच्या घटनेत 59 कारसेवकांचा मृत्यू झाल्यामुळे गुजरातच्या इतिहासातील सर्वात भीषण जातीय दंगल झाली, ज्यामध्ये 1,000 हून अधिक लोक मारले गेले. अशोक रावल म्हणाले की, राम मंदिराच्या उभारणीसाठी विहिंपने 225 कोटी रुपयांच्या देणग्या गोळा करून या उदात्त कार्यात योगदान दिले आहे.
6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडल्यानंतर, 27 फेब्रुवारी 2002 रोजी गुजरातमधील गोध्रा ट्रेन आगीची घटना देशाच्या इतिहासात कायमची नोंद झाली. या दिवशी गोध्रा रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या साबरमती एक्स्प्रेसला आग लावली, ज्यात ५९ कारसेवकांचा होरपळून मृत्यू झाला. यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. त्यानंतर गुजरातमध्ये भीषण जातीय दंगली उसळल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.