Lockdown News : लॉकडाऊनमध्ये मजुरांना विमानाने घरी पाठविणाऱ्या शेतकऱ्याची आत्महत्या; कारण...

farmer pappan singh
farmer pappan singh
Updated on

नवी दिल्ली - मशरूमच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांना विमानाने बिहारला पाठवणारे आणि लॉकडाऊननंतर मजुरांना विमानानेच परत बोलावणारे शेतकरी पप्पनसिंह गेहलोत यांनी आत्महत्या केली आहे. त्यांचा मृतदेह त्यांच्या घराशेजारी असलेल्या शिवमंदिरात लटकलेल्या अवस्थेत आढळूनआला. त्यांच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोटही मिळाली आहे. (Lockdown News in Marathi)

farmer pappan singh
Sangli News: खासगी रुग्णालयात रुग्णावर जादूटोण्याने उपचाराचा प्रयत्न सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघड

सुसाईड नोटमध्ये पप्पनसिंह यांनी म्हटलं की, दीर्घ आराजामुळे आत्महत्येचं पाऊल उचलत आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तर अलीपूर पोलीस ठाण्याने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे तिगीपूर गावात एकच खळबळ उडाली आहे.

तिगीपूर गावातील मशरूम उत्पादक पप्पनसिंग गहलोत यांनी मंगळवारी सायंकाळी गळफास घेऊन आपले जीवन संपवले. सुसाईड नोटमध्ये त्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे आत्महत्या केल्याचं लिहिलं आहे. तिगीपूर गावात मशरूमची लागवड फार कमी शेतकऱ्यांकडून केली जाते, त्यापैकीच एक म्हणजे पप्पनसिंग गेहलोत यांनी आपल्या शेतात काम करणाऱ्या मजुरांना लॉकडाऊनच्या काळात विमानाने बिहारला पाठवले होते. त्यानंतर लॉकडाऊन संपल्यावर त्याच मजुरांना विमानानेच परत बोलावले. त्यामुळे ते चर्चेत आले होते.

farmer pappan singh
Corona Update : केंद्र सरकारकडून आंतरराष्ट्रीय प्रवासासंदर्भात मार्गदर्शक तत्वे जाहीर....

पप्पनसिंग गेहलोत हे अत्यंत आनंदी आणि मनमोकळेपणाने वागणारे व्यक्ती होते. त्याच पद्धतीने आपल्या मजुरांशी ते वागत असे. श्रीमंत आणि गरीब असा फरक त्यांना कधीच केला नाही. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते, असे सांगितले जाते. मात्र आजारपणामुळे त्यानी आत्महत्या केल्याची चर्चा लोकांच्या पटत नाही. पप्पनसिंग गेहलोत यांच्या आत्महत्येबद्दल कोणालाही विश्वास बसत नाही. एवढा आनंदी आणि मोकळ्या मनाचा व्यक्ती एवढे टोकाचे पाऊल कसे उचलू शकते, असा प्रश्न उपस्थित होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.