Delhi Farmer Protest: शेतकरी आंदोलनात मृत्यू झालेल्या शुभकरणच्या कुटुबिंयाना आप सरकारची मदत; बहिणीला सरकारी नोकरी अन् एक कोटी...

Delhi Farmer Protest: शेतकरी आंदोलनादरम्यान खनौरी सीमेवर मृत्यू झालेल्या शुभकरण सिंग यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची भरपाई मिळणार आहे. याशिवाय शेतकरी शुभकरणच्या धाकट्या बहिणीलाही सरकारी नोकरी देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
Delhi Farmer Protest
Delhi Farmer ProtestEsakal
Updated on

शेतकरी आंदोलनादरम्यान खनौरी सीमेवर मृत्यू झालेल्या शुभकरण सिंग यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची भरपाई मिळणार आहे. पंजाबच्या आम आदमी पक्षाच्या सरकारने ही रक्कम देण्याची घोषणा केली आहे. आज (शुक्रवारी) मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ट्विट करून या निर्णयाची माहिती दिली आहे. धाकट्या बहिणीलाही सरकारी नोकरी देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.(farmer shubhkaran singh family will get 1 crore rupees and government job)

भगवंत मान यांनी ट्विट केले की, "खनौरी सीमेवर शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या शुभकरण सिंग यांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून एक कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल आणि त्यांच्या लहान बहिणीला सरकारी नोकरी दिली जाईल. दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. माझे कर्तव्य पार पाडत आहे."

Delhi Farmer Protest
Who is Shubhkaran Singh: खनौरी सीमेवर कसा झाला 22 वर्षांच्या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू? कोण होते शुभकरन सिंग? जाणून घ्या

शुभकरण सिंग यांनी यापूर्वी 2020-21 मध्ये शेतकरी आंदोलनात सहभाग घेतला होता, जेव्हा तो केवळ 17 किंवा 18 वर्षांचा होता. शेतकरी आंदोलनात शुभकरण सिंग याचा मृत्यू झाला आहे. शुभकरण सिंग याचा मृत्यू गोळी लागल्याने झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे, मात्र त्याच्या डोक्यात कोणती गोळी लागली होती. त्याची माहिती शवविच्छेदन अहवालातूनच समोर येईल. दरम्यान, शेतकरी आणि सरकारमध्ये सुरू असलेल्या चर्चेवर कोणताही निर्णय झालेला नाही. शेतकरी नेत्यांनी पुन्हा दिल्लीकडे मोर्चा वळवण्याची घोषणा केली आहे. 23 फेब्रुवारीला देशभरात शेतकरी संघटना ब्लॅक फ्राय डे करत आहेत.

Delhi Farmer Protest
Farmers protest Delhi: तरुण आंदोलकाच्या मृत्यूनंतर ‘दिल्ली चलो’ मोर्चा शुक्रवारपर्यंत स्थगित; शेतकरी नेते पंढेर यांची माहिती

सध्या सरकारने शेतकरी आंदोलकांना चर्चेच्या पाचव्या फेरीचा प्रस्ताव दिला आहे, मात्र अद्याप त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. संयुक्त किसान मोर्चाने तर २६ फेब्रुवारीला देशभरात ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. शुभकरण सिंग याच्या निधनानंतर शेतकरी आक्रमक झाले आहेत. शुभकरण सिंग याच्या निधनावरून पंजाबमध्येही राजकारण तापलं आहे.

पंजाब सरकारच्या निष्काळजीपणामुळे शुभकरण सिंग यांचा मृत्यू झाल्याचा आरोप अकाली दलाने केला आहे. हरियाणा पोलिसांचे ड्रोन पंजाबच्या सीमेत घुसून शेतकऱ्यांवर कसे हल्ले करत आहेत, असे अकाली दलाने म्हटले आहे. पंजाब पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करावी, असंही त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.