शेतकऱ्यांची पुन्हा भारत बंदची हाक; राजधानीत बंदोबस्त

farmer protest
farmer protestsakal
Updated on

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेले दहा महिने दिल्लीच्या सीमांवर चिकाटीने आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाने सोमवारी (ता. २७) भारत बंदची हाक दिली आहे. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, बसपा, डावे पक्ष, राष्ट्रीय जनता दल, दिल्लीतील सत्तारूढ आम आदमी पक्ष आणि द्रमुकसह अनेक राजकीय पक्षांनी भारत बंदला पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी रविवारी संध्याकाळपासूनच कडेकोट बंदोबस्तास सुरवात केली. या वर्षीच्या प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीच्यावेळी हिंसाचार झाला. याच्या आठवणी दिल्लीकरांच्या मनात अजून ताज्या असल्याने दिल्ली पोलिस कोणताही धोका स्वीकारण्यास तयार नाहीत.

farmer protest
Podcast: राज्यात मुसळधार पावसाचा इशारा ते कोल्हापुरी फुटबॉल चाहते जगात भारी

पंजाब सरकारनेही या बंदला पाठिंबा दिला आहे. शेतकरी आंदोलनास दहा महिने पूर्ण झाल्यानंतरही केंद्र सरकारकडून पुन्हा चर्चेची तयारी दाखवली गेली नसल्याबद्दल या आंदोलनात सहभागी ४० शेतकरी संघटनांमध्ये तीव्र नाराजी आहे आणि शेतकरी आता “आर या पार”च्या पवित्र्यात आले असल्याचे आंदोलनस्थळी सांगितले जाते. संयुक्त किसान मोर्चाने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी सहा ते संध्याकाळी चारपर्यंत बंद राहणार आहे. या काळात सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये, बाजारपेठा, शिक्षणसंस्था, व्यावसायिक उपक्रम, औद्योगिक वसाहती हे बंद राहतील तर वैद्यकीय सेवा, रुग्णवाहिका, मेडिकल दुकाने, दूध आणि भाजीपाला सारख्या जीवनावश्यक वस्तू आणि आणीबाणीच्या सेवांना मुभा असेल.

farmer protest
पंजाब: मंत्रिमंडळात सहा नवे चेहरे; विस्तारात १५ जणांचा समावेश

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यापूर्वीच बंदला पाठिंबा दिला आहे. याशिवाय पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी, तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बिहारच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, भाकप नेते डी. राजा आदी विविध पक्षांच्या नेत्यांनीही या बंदला पाठिंबा दिला आहे.

रविवार असूनही वाहतूक कोंडी

उद्याच्या बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिस कोणताही धोका स्वीकारण्यास तयार नाहीत. त्यामुळे आजपासूनच दिल्लीत प्रवेश करणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर अडथळे उभारण्यात आले आहेत. मध्य दिल्ली, जंतर मंतर आणि संसदेकडे जाणाऱ्या मार्गावर यमुनेवरील लोकनायक पूल, मंडी हाउस, आयटीओ यांसह अनेक ठिकाणी लोखंडी अडथळे पोलिसांनी उभे केले. यामुळे रविवार असूनही संध्याकाळी वाहतुकीची मोठी कोंडी झाली. दिल्लीच्या

सीमांवर तीन ठिकाणी प्रदर्शन करणाऱ्या शेतकऱ्यांना कोणत्याही ठिकाणांहून दिल्लीत प्रवेश करण्याची परवानगी दिली गेलेली नाही. पुरेसे सुरक्षा बळ दिल्लीत ठिकठिकाणी तैनात करण्यात आल्याचेही पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

२७ सप्टेंबरच्या भारत बंदमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनीदेखील मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा. एकजुटीने लढण्याची हीच वेळ आहे.

- संदीप गिड्डे पाटील, राष्ट्रीय किसान महासंघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.