नवी दिल्ली : आपल्या विविध मागण्यासांठी दिल्लीच्या वेशीवर येऊन ठाण मांडलं आहे. यामुळं दिल्लीचं जनजीवन विस्कळीत झालं असून या शेतकऱ्यांचं आंदोलन रोखण्यात यावं, यासाठी सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशननं थेट सरन्यायाधिशांना पत्र लिहिलं आहे. (farmers delhi chalo march writes to CJI to take suo motu action against farmers)
पिकांची किमान आधारभूत किंमत अर्थात एमएसपीच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यासांठी उत्तर भारतातील विविध शेतकरी संघटनांनी आज 'दिल्ली चलो'ची हाक दिली आहे. त्यासाठी शेतकरी सध्या दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. त्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी राजधानीच्या सर्व सीमा बॅरिकेट्स, तारेचे काटेरी कुंपण लावून सील करण्यात आल्या आहेत. (Marathi Tajya Batmya)
यामुळं दिल्लीतील दररोजच्या व्यवहारांवर परिणाम झाला असून शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली असून अनेक सेवा विस्कळीत झाल्या आहेत. यासाठी सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष अदिश अग्गरवाला यांनी सरन्यायाधिशांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी सुओमोटो याचिका दाखल करुन घेण्याची विनंती करण्यात आली आहे. (Latest Marathi News)
त्याचबरोबर, या पत्रातून असा आरोपही करण्यात आला आहे की, हा उपद्रव निर्माण करण्याचा आणि नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न आहे. न्यायालयांसमोर वकिलांच्या अनुपस्थितीमुळं कोणताही प्रतिकूल आदेश देऊ नये, यासाठी न्यायालयांना निर्देश देण्याची विनंतीही त्यांनी सरन्यायाधिशांना केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.