Farmers Protest : दिल्लीकडे कूच करणार 200 शेतकरी संघटना! प्रशासन अलर्ट मोडवर; कलम 144, ट्रॅफिक अ‍ॅडव्हायजरी जारी

Farmers Protest Update : शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत एका महिन्यासाठी कलम 144 लागू करण्यात आले आहे.
Farmers Protest : दिल्लीकडे कूच करणार 200 शेतकरी संघटना! प्रशासन अलर्ट मोडवर; कलम 144, ट्रॅफिक अ‍ॅडव्हायजरी जारी
Updated on

Farmers Delhi Chalo Protest : शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत एका महिन्यासाठी कलम 144 लागू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या 'दिल्ली चलो' मोर्चामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून परिस्थिती हाताळण्यासाठी मोठ्या प्रमानावर प्रयत्न केले जात आहेत.

दिल्ली पोलिसांनी राष्ट्रीय राजधानीत एका महिन्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) चे कलम 144 लागू केले आहे. कलम 144 लागू झाल्यामुळे देशाच्या राजधानीत Ele सभा, मिरवणूक किंवा रॅली आयोजित करण्यावर आणि नागरिकांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या प्रवेशावर पूर्ण बंदी असेल.

काय म्हणाले शेतकरी नेते?

पंजाब (किसान मजदूर संघर्ष कमेटी) KMSC चे अध्यक्ष सुखविंदर सिंग सभारा यांनी सांगितले की, "उद्या सकाळी... 200 शेतकरी संघटना दिल्लीकडे कूच करतील... अपूर्ण राहिलेले आंदोलन पूर्ण करण्यासाठी... 9 राज्यांतील शेतकरी संघटना संपर्कात आहेत... पुद्दुचेरी, कर्नाटक, तामिळनाडू, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि पंजाब ही सर्व राज्ये आंदोलनासाठी सज्ज आहेत.

Farmers Protest : दिल्लीकडे कूच करणार 200 शेतकरी संघटना! प्रशासन अलर्ट मोडवर; कलम 144, ट्रॅफिक अ‍ॅडव्हायजरी जारी
Ashok Chavan Resigns : आम्ही अजूनही काँग्रेसमध्येच...; चव्हाणांसोबत पक्ष सोडल्याच्या चर्चांवर 'या' आमदारांचं स्पष्टीकरण

दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीवर बंदी

मात्र दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, कोणत्याही प्रकारची रॅली किंवा मिरवणूक काढण्यावर आणि रस्ते रोखण्यावर बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश 12 फेब्रुवारी ते 12 मार्चपर्यंत लागू असेल. दिल्ली पोलिसांच्या आदेशानुसार, ट्रॅक्टर रॅलींना राष्ट्रीय राजधानीच्या सीमा ओलांडण्यास बंदी घालण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी ट्राफिक अॅडव्हायजरी देखील जारी केला आहे.

मार्चदरम्यान पंजाब, उत्तर प्रदेश आणि हरियाणातील शेतकरी दिल्लीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. 11 फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या दिल्ली पोलिस आयुक्तांच्या आदेशात म्हटले आहे की संयुक्त किसान मोर्चा (SKM), किसान मजदूर मोर्चा (KMM) आणि इतर अनेक शेतकरी यूनियन आणि संघटनांनी त्यांच्या मागण्यांसाठी संसदेबाहेर आंदोलन करण्यासाठी 13 फेब्रुवारी रोजी 'दिल्ली चलो' आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

Farmers Protest : दिल्लीकडे कूच करणार 200 शेतकरी संघटना! प्रशासन अलर्ट मोडवर; कलम 144, ट्रॅफिक अ‍ॅडव्हायजरी जारी
Ashok Chavan Resignation : "अचानक असं काय घडलं? मला वाटतं की...", अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर ठाकरे स्पष्टच बोलले

हरियाणातील अनेक जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद

शेतकरी आंदोलनाबाबत गुरुग्राम प्रशासनही सतर्क झाल्याचे पाहायला मिळाले. हरियाणातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन पाहता कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. गुरुग्रामच्या जिल्हा प्रशासनाकडूनही दक्षता घेण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.