Sugarcane Crop : "किती माकड येतात ते बघतोच"; उसाचे रक्षण करण्यासाठी शेतकरी बनला अस्वल

Farmers in Lakhimpur Kheri-Jahan Nagar village use a bear costume to prevent monkeys from damaging their sugarcane crop
Farmers in Lakhimpur Kheri-Jahan Nagar village use a bear costume to prevent monkeys from damaging their sugarcane crop
Updated on

शेतकऱ्यांच्या पिकाचे माकड मोठ्या प्रमाणात नुकसान करत असतात. माकडांना हाकलून लावताना शेतकऱ्यांच्या फार हाल होतात. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये माकडांच्या उपद्रवामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. माकडांना पिके नष्ट करण्यापासून वाचवण्यासाठी शेतकरी प्रत्येक युक्ती अवलंबत आहेत. मात्र माकडांना उच्छाद काही कमी होत नाही.

आता लखीमपूर खेरी येथील एका गावातील शेतकऱ्यांनी माकडांना हुसकावून लावण्यासाठी नामी शक्कल लढवली आहे. याची सर्वत्र चर्चा होत आहे.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात माकडांपासून आपली पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना अस्वल व्हावे लागत आहे. शेतकरी अस्वल बनून आपल्या शेताचे रक्षण करत आहेत. लखीमपूर खेरी येथील जहान नगर गावातील शेतकरी माकडांना त्यांच्या उसाच्या पिकाचे नुकसान करू नये म्हणून अस्वलाच्या पोशाखाचा वापर करतात.

माकडांपासून पिकाचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी अस्वलाच्या पोशाखाची खरेदी केली. माकडे पिकाचे नुकसान करू नयेत म्हणून शेतकरी हा पोशाख घालून शेतात बसतात. अस्वलाचा पोशाख घातलेला शेतकरी शेतात बसल्याचे चित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Farmers in Lakhimpur Kheri-Jahan Nagar village use a bear costume to prevent monkeys from damaging their sugarcane crop
Ashadhi wari 2023 : संत गजानन महाराज पालखीचे मोहोळ तालुक्यात जल्लोषात स्वागत

गजेंद्र सिंह या शेतकऱ्याने सांगितले की, 40-45 माकडे परिसरात फिरत आहेत आणि पिकांचे नुकसान करत आहेत. आम्ही अधिकाऱ्यांना निवेदन दिले, पण त्यांनी लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे आम्ही (शेतकऱ्यांनी) आमच्या पिकांचे रक्षण करण्यासाठी अस्वलाता ड्रेस 4 हजार रुपयांना विकत घेतला. (latest marathi news)

शेतकऱ्याचे अस्वलाचा वेश घेतलेले फोटो व्हायरल झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे. विभागीय वन अधिकारी संजय बिस्वाल म्हणाले की, "मी शेतकऱ्यांना आश्वासन देतो की माकडांना पिकांचे नुकसान करण्यापासून रोखण्यासाठी आम्ही सर्व उपाययोजना करू."

Farmers in Lakhimpur Kheri-Jahan Nagar village use a bear costume to prevent monkeys from damaging their sugarcane crop
ITR Filing: पगार कमी किंवा जास्त असला तरी फाइल करा ITR; आहेत मोठे फायदे, अनेक गोष्टी होतील सोप्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.